Canada: टोरंटो विमानतळावर डेल्टा एअरलाइन्सचे विमान कोसळलं, 18 जण जखमी
Delta Air Lines: कॅनडातील टोरंटो येथील पिअर्सन आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंग दरम्यान डेल्टा एअरलाइन्सचे विमान कोसळलं आहे. हे विमान अमेरिकेतील मिनियापोलिसहून टोरंटोला येत होते. या विमानात 76 प्रवासी आणि 4 क्रू मेंबर्ससह 80 लोक होते. या अपघातात 18 जण जखमी झाले असून त्यापैकी 2 दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार फ्लॅप अॅक्च्युएटर फेल्युअर (FAF) मुळे विमानाच्या पंखांवरील फ्लॅप्स योग्यरित्या काम करत नव्हते, ज्यामुळे विमान लँडिंग दरम्यान अचानक कोसळले. काही रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की, त्यावेळी टोरंटोमध्ये जोरदार हिमवादळ होते आणि वाऱ्याचा वेग ताशी 65 किमी होता, जो या अपघाताचे कारण असू शकतं म्हटलं जात आहे.
A Delta Air Lines regional jet flipped upside down upon landing at Canada's Toronto Pearson Airport | Initial reports indicate there are no fatalities, and 18 customers with injuries have been transported to area hospitals. Our primary focus is taking care of those impacted:… pic.twitter.com/Te6N5ddR6u
— ANI (@ANI) February 18, 2025
कॅनडाचे वाहतूक सुरक्षा मंडळ (TSB) आणि यूएस राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळ (NTSB) या अपघाताची चौकशी करत आहेत. अपघातानंतर लगेचच बचाव पथकाने सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढलं असून अग्निशमन दलाने विमानातील आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. या अपघातामुळे टोरंटो विमानतळावरील 200 हून अधिक उड्डाणे तात्पुरती थांबवण्यात आली होती, परंतु काही तासांनंतर विमान वाहतूक पुन्हा सुरू झाली.












Click it and Unblock the Notifications