Israel-Hamas War: गाझा येथील शाळेवर इस्रायलचा विनाशकारी हल्ला, 100 हून अधिक पॅलेस्टिनी ठार
Israel-Hamas War : गाझाच्या दराज जिल्ह्यातील एका शाळेवर इस्रायली हवाई हल्ल्यात 100 हून अधिक पॅलेस्टिनी ठार झाले आहेत. तर अनेक जण जखमी झाले आहेत. अधिकृत पॅलेस्टिनी वृत्तसंस्था वाफाच्या माहीतीनुसार हल्ला झाला तेव्हा शाळा विस्थापित नागरिकांसाठी आश्रयस्थान म्हणून काम करत होती.
गाझा शहरातील एका शाळेवर इस्रायली हल्ल्यानंतर गाझाच्या सरकारी मीडिया कार्यालयाने एक निवेदन जारी केले आहे, ज्यात किमान 100 लोक मारले गेले असल्याचं म्हटलं आहे. निवेदनात म्हटले आहे की, "इस्रायली कब्जा करणा-या सेनाने गाझा शहरातील अल-तबायिन शाळेच्या आत एक नरसंहार केला आहे, ज्यात 100 हून अधिक लोक मारले गेले आहेत. तर अनेक जण जखमी झाले आहेत.

आमच्या पॅलेस्टिनी लोकांविरुद्ध नरसंहार केला आहे.निवेदनात पुढे म्हटले आहे की, "जेव्हा लोक पहाटेची नमाज करत असताना त्यांच्यावर थेट बॉम्बफेक करण्यात आली. यामुळे शहीदांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली." पॅलेस्टाईनने म्हटले आहे की "हत्याकांडाच्या भीषणतेमुळे आणि मोठ्या संख्येने लोक शहीद झाली आहेत. त्यामुळे वैद्यकीय पथके, नागरी संरक्षण, मदत आणि आपत्कालीन पथकांनी अद्याप सर्व शहीदांचे मृतदेह बाहेर काढले नाहीत.
आम्ही या भयंकर नरसंहाराचा तीव्र शब्दात निषेध करतो. आम्ही संपूर्ण जगाला याचा निषेध करण्याचे आवाहन करतो. आम्ही या नरसंहारासाठी कब्जा करणा-या इस्रायली सेना आणि अमेरिकन प्रशासनाला पूर्णपणे जबाबदार धरतो. आम्ही आंतरराष्ट्रीय समुदाय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांना गाझा पट्टीतील नागरिक आणि विस्थापित व्यक्तींविरूद्ध सुरु असलेल्या नरसंहार आणि गुन्हे थांबविण्यासाठी आवाहन करतो."












Click it and Unblock the Notifications