कोण होते पोप फ्रान्सिस? केव्हा बनले होते पोप? कोणत्या विवादाला गेले सामोरे? वाचा, संपूर्ण इतिहास
कॅथोलिक ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे आज वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले. पोप यांनी आज स्थानिक वेळेनुसार सकाळी ७:३५ वाजता अखेरचा श्वास घेतला. पोप फ्रान्सिस हे इतिहासातील पहिले लॅटिन अमेरिकन पोप होते. गेल्या काही महिन्यांपासून ते आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त होते. १४ फेब्रुवारी रोजी त्यांना रोमच्या जेमेली रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर न्यूमोनिया उपचारही सुरू होता. फुफ्फुसाच्या संसर्गामुळे त्यांना ५ आठवडे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

कशामुळे झाला मृत्यू?
कॅथोलिक चर्चचे मुख्यालय असलेल्या व्हॅटिकनने म्हटले होते की, पोपच्या रक्त तपासणी अहवालात मूत्रपिंड निकामी होण्याची लक्षणे दिसून आली. याव्यतिरिक्त, प्लेटलेट्सची कमतरता देखील आढळून आली. तथापि, त्यांना १४ मार्च रोजी डिस्चार्ज देण्यात आला होता. अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी कालच त्यांची भेट घेतली. परंतु आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला. ते गेल्या काही आठवड्यांपासून आजारी होते.
कधी बनले होते पोप?
पोपचा जन्म १७ डिसेंबर १९३६ रोजी अर्जेंटिनामधील फ्लोरेन्स येथे झाला. पोप होण्यापूर्वी ते जॉर्ज मारियो बर्गोग्लिओ या नावाने ओळखले जात होते. पोप फ्रान्सिसचे आजी-आजोबा हुकूमशहा बेनिटो मुसोलिनीपासून वाचण्यासाठी इटली सोडून अर्जेंटिनाला गेले. पोपने त्यांचे बहुतेक आयुष्य अर्जेंटिनाची राजधानी ब्यूनस आयर्समध्ये घालवले आहे. पोप फ्रान्सिस हे अर्जेंटिनाचे जेसुइट धर्मगुरू होते. जे २०१३ मध्ये रोमन कॅथोलिक चर्चचे २६६ वे पोप बनले. त्यांना पोप बेनेडिक्ट सोळावा यांचे उत्तराधिकारी म्हणून निवडण्यात आले होते. पोप फ्रान्सिस हे गेल्या १००० वर्षात पहिले व्यक्ती होते जे युरोपियन नव्हते परंतु कॅथोलिक धर्मात सर्वोच्च पदावर पोहोचले.
कसे राहिले आयुष्य?
पोप हे सोसायटी ऑफ जीझस (जेसुइट्स) चे सदस्य असलेले पहिले पोप होते. तसेत अमेरिकेतून आलेलेही ते पहिले पोप होते. त्यांनी ब्युनोस आयर्स विद्यापीठातून तत्वज्ञान आणि धर्मशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवली होती. १९९८ मध्ये ते ब्यूनस आयर्सचे आर्चबिशप बनले. २००१ मध्ये पोप जॉन पॉल दुसरे यांनी त्यांना कार्डिनल बनवले.
घेतले महत्त्वपूर्ण निर्णय
पोप पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या ४ महिन्यांनी त्यांनी समलैंगिकतेच्या मुद्द्यावर मोठा निर्णय घेतला. या निर्णयाची चांगलीच चर्चा झाली.'जर समलिंगी व्यक्ती देवाचा शोध घेत असेल, तर मी त्याला न्याय देणारा कोण?' असे म्हणत त्यांनी समलैंगिंकांच्या बाजूने ठाम भूमिका घेतली. याशिवाय पोपने पुनर्विवाह करणाऱ्या घटस्फोटित कॅथोलिकांना धार्मिक मान्यता दिली. ज्यांच्यावर सामाजिक बहिष्कार आहे अशा लोकांसोबत सहभोजनही घेतले.












Click it and Unblock the Notifications