चीन दरवर्षी करतंय शेकडो टन सोने खरेदी; सोन्याच्या किमती वाढविण्यासोबत हा आहे 'प्लॅन'
भारतीय बाजारपेठेत सोन्याचे दर गगनाला भिडले आहे. जागतीक बाजारातही सोने गेल्या दोन वर्षांपासून ५० टक्क्यांपेक्षा जास्त महागले आहे. जागतीक बाजारपेठेत सोन्याच्या किंमती वाढायला चीन जबाबदार आहे का, अशा चर्चा आता सुरु झाल्या आहेत. चीन दरवर्षी शेकडो टन सोने खरेदी करुन आपले भांडार वाढवत आहे. परंतु त्यांच्या या सोनेखरेदीमुळे सोन्याचे बाजार वाढत असल्याचे सांगितले जात आहे.

बाजारपेठे अस्थिर
रशिया आणि युक्रेन सध्या युद्ध आहे. दुसरीकडे इस्रायलचेही गाझापट्टीत हल्ले सुरु आहेत. अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरीफ योजना जाहीर केली आहे. निर्वासितांना ते त्यांच्या देशातून बाहेर काढत आहे. या सगळ्या कारणांमुळे सध्या जागतिक बाजारपेठ अस्थिर झाल्याचे सांगितले जात आहे. जागतिक बाजारपेठ अस्थित होत असल्याने प्रत्येक देश आपल्या सोन्याच्या भंडारात वाढ करताना दिसत आहे. वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलने जाहिर केलेल्या आकडेवारीनुसार, २०२३ साली चीनने जगात सर्वाधिक 378.2 टन सोन्याचे उत्पादन केले होते. तरीही चीनने सोने खरेदीचा सपाटा लावला आहे.
चीनचा सोन्याकडे कल
चीनमध्ये पारंपारिक गुंतवणूकीचे पर्याय असलेल्या रिअल इस्टेट आणि स्टॉक मार्केटमध्ये घसरण सुरु आहे. गुंतवणूकदाराचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. त्यामुळे चीन सोने खरेदीकडे वळाला आहे. एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून तो सोन्याकडे वळाला आहे. चीनची केंद्रीय बँकही गोल्ड रिझर्व्हला वाढवताना दिसत आहे.
चीनचा वाढता दबदबा
चीन बऱ्याच काळापासून आपल्या रिझर्व्ह फंड्सला डाईव्हर्सिफाय करीत आहे. चीनने अमेरिकेच्या डॉलरवरील आपले अवलंबित्व कमी केले आहे. गेल्या एक दशकापासून चीनने अमेरिकन ट्रेझरी बॉण्डमध्ये आपली गुंतवणूक कमी केली आहे. यंदा चीन घरगुती चलनाऐवजी विदेशी चलनाद्वारे सोने खरेदी करीत आहे. ज्याद्वारे चीन अमेरिकन डॉलर आणि अन्य विदेशी चलनावरील आपले अवलंबित्व कमी करीत आहे.
सोन्याची किंमत वाढणार?
चीनचे सर्वसामान्य गुंतवणूकदार आणि सरकार दोघेही सोन्यात गुंतवणूक करीत आहेत. ज्यामुळे सोन्याची किंमत लागोपाठ वाढत चालली आहे. तज्ज्ञांच्या मते जर चीन याच वेगाने सोने खरेदी करीत राहीला, तर सोन्याच्या किंमती जागतिक बाजारपेठेत आणखी वाढतील. चीन भविष्यात सोन्याला डॉलरला पर्यायाच्या रुपात वापरणार आहे. असे झाले तर अर्थव्यवस्थेत पुन्हा सोन्याला महत्व वाढणार आहे.












Click it and Unblock the Notifications