Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

China 76 Young Scientists Died : चीनमध्ये का होत आहेत वैज्ञानिकांचे मृत्यू! आतापर्यंत 76 जण शिकार!

China 76 Young Scientists Died in 2025 : मानवी क्षमतेच्या आणि नैतिकतेच्या सर्व सीमा ओलांडणाऱ्या एका भीषण सत्यतेने चीनच्या शैक्षणिक आणि वैज्ञानिक वर्तुळात भूकंप आणला आहे. कॉम्प्युटर प्रोग्रामर्सच्या ऑनलाइन मंचावर (CSND) समोर आलेल्या आकडेवारीनुसार, सन २०२५ मध्ये ६० वर्षांखालील तब्बल ७६ तरुण संशोधकांचा अकाली मृत्यू झाला आहे. जी आकडेवारी मागील वर्षाच्या तुलनेत दुप्पट आहे.

ही केवळ आकडेवारी नाही, तर चीनच्या विकासाच्या धावपळीत अत्याधिक कामाच्या ताणाखाली -वर्क ट्रेसखाली चिरडल्या गेलेल्या युवा प्रतिभेच्या स्वप्नांचा आणि जीवनाचा सामूहिक अंत आहे. चीनच्या प्रयोगशाळांमध्ये आणि विद्यापीठांमध्ये नेमके काय चालले आहे, आणि ही वाढती मृत्युसंख्या भविष्यातील मोठ्या धोक्याचा संकेत तर नाही ना, असा काळजीचा प्रश्न या घटनेने संपूर्ण जगासमोर उभा केला आहे.

China 76 Young Scientists Died in 2025

डेटाबेसने उघड केली धक्कादायक आकडेवारी

एका डेटा फाइलनुसार, चीनमध्ये सन २०२५ मध्ये आतापर्यंत ६० वर्षांपेक्षा कमी वयाच्या किमान ७६ युवा संशोधकांचा मृत्यू झाला आहे, तर संपूर्ण मागील वर्षात ही संख्या केवळ ४४ होती. यादीतील सर्वात कमी वयाच्या वैज्ञानिक डॉन्ग सिजिया होत्या, ज्या नानजिंग विद्यापीठात समुद्र विज्ञान सहाय्यक प्राध्यापक होत्या. त्यांचा मृत्यू अवघ्या ३३ व्या वर्षी झाला.

आत्महत्येचे वाढते प्रमाण..

हाँगकाँगमध्ये तरुणांमध्ये आत्महत्येचे प्रमाण सातत्याने वाढत आहे, ज्यामुळे ही समस्या अधिक गंभीर झाली आहे. या डेटाचा उद्देश सरकारला क्षेत्रीय असमानता दाखवणे आणि धोरण निर्मितीमध्ये मदत करणे हा आहे, असे संकलकाने स्पष्ट केले आहे.

मृत्यूचे सर्वात मोठे कारण काय?

मे २०२४ मध्ये 'प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन रिपोर्ट्स' जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासाने या मृत्यूंमागील सर्वात मोठे कारण समोर आणले आहे. अत्याधिक कामाचा ताण आणि वाढती आत्महत्या हे आहे. या रिसर्चमध्ये आढळले की, चीनच्या अकॅडमिक क्षेत्रातील आत्महत्यांची संख्या वाढत आहे, तर देशातील इतर भागांमध्ये ती कमी होत आहे.

६५ टक्के या कारणामुळे बळी

सुमारे ६५ टक्के प्रकरणांमध्ये कामाचा अत्यधिक ताण हेच मुख्य कारण होते. बहुतेक बळी हे युवा पुरुष वैज्ञानिक होते, जे विज्ञान आणि अभियांत्रिकीसारख्या कठीण विषयांशी जोडलेले होते. या आकडेवारीतून या गोष्टीं पुढे येत आहेत की, चीनच्या सरकारी आणि अकॅडमिक यंत्रणा मानवी श्रमाचा आणि क्षमतेचा गैरवापर करत आहेत, ज्यामुळे युवा पिढी मोठ्या मानसिक ताणाखाली जगत आहे.

नैतिक वाद आणि टीका

या 'डेथ डेटाबेस'वर अनेक स्तरांवर टीकाही झाली आहे.

१. खासगी माहितीचे उल्लंघन: मृत वैज्ञानिकांच्या कुटुंबीयांची परवानगी न घेता ही खासगी माहिती सार्वजनिक केल्यामुळे संवेदनहीनता आणि नैतिक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

२. तुलनेचा अभाव: केवळ युवा शिक्षक आणि संशोधकांनाच या यादीत का समाविष्ट केले गेले, असा प्रश्न टीकाकारांनी उपस्थित केला आहे. मृत्युदर अधिक आहे की नाही, हे स्पष्ट होण्यासाठी मजूर किंवा चालक यांसारख्या इतर व्यवसायांतील मृत्युदराची तुलना करणे आवश्यक आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+