चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडिया मोठा धक्का,संघातील सदस्याच्या वडिलांचं निधन, खेळाडू घरी परतला
Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यापूर्वी टीम इंडियाला एक मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाच्या एका महत्त्वाच्या सदस्याच्या वडिलांच्या निधनाची बातमी आहे. ते आता दुबई सोडून घरी परतले आहेत. दोनच दिवसांपूर्वी टीम इंडियाचा संघ चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी दुबईला पोहोचला आहे.
टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल यांच्या वडिलांचं निधन झालं आहे. दैनिक जागरणच्या वृत्तानुसार ते दुबईहून दक्षिण आफ्रिकेला परतले आहेत. मोर्ने मॉर्केल आता संघात कधी परत येईल याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

दरम्यान 17 फेब्रुवारी रोजी दुबईमध्ये टीम इंडियाचा सराव शिबिर होते. त्यावेळी मॉर्केल तिथे उपस्थितीत नव्हते. टीम इंडिया यूएईमध्ये पोहोचल्यानंतर मॉर्ने मॉर्केल पहिल्या दिवशी सराव सत्रात संघासोबत उपस्थित होते, परंतु या दु:खद घटनेमुळे ते दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेला परतले आहेत.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्येच मॉर्केलने प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेतली. गौतम गंभीर प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मॉर्केलला संघात आणण्यात आले. त्याने केकेआरसोबतही काम केले आहे. त्यावेळी गौतम गंभीर तिथे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम करत होते.
मॉर्केलचे अचानक अशा प्रकारे निघून जाणे टीम इंडियासाठी चांगली बातमी नाही. संघाचा महत्वाचा गोलंदाज जसप्रीत बुमराह आधीच संघाबाहेर आहे. शमी तंदुरुस्तीनंतर संघात परतत आहे. अर्शदीप सिंग अजूनही तरुण आहे आणि त्याला एकदिवसीय खेळण्याचा फारसा अनुभव नाही.
टीम इंडियाचा पहिला सामना बांगलादेशविरुद्ध
टीम इंडियाचा पहिला सामना बांगलादेशविरुद्ध आहे. हा सामना 20 फेब्रुवारी रोजी खेळला जाईल. यानंतर 23 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानशी एक सामना आहे. हा एक मोठा सामना असणार आहे. मॉर्केल संघात कधी परतणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. भारतीय संघ सरावात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.












Click it and Unblock the Notifications