Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Justin Trudeau:जस्टीन ट्रुडोंचा पंतप्रधानपदाचा राजीनामा; कॅनडात खळबळ, येवढा मोठा निर्णय का घेतला?

canadian prime minister trudeau resigns : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी पक्षाच्या नेतेपदाचा आणि पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलाच खळबळ उडाली आहे. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी देशवासियांशी संवाद साधला, यात त्यांनी राजीनाम्याची घोषणा केली.

जस्टीन ट्रूडो म्हणाले की, त्यांनी त्यांच्या लिबरल पक्षाच्या अध्यक्षांना नवीन नेता निवडण्यास सुरुवात करण्यास सांगितले आहे. जर मला घरच्या मैदानावर लढावे लागले तर येत्या निवडणुकीत मी सर्वोत्तम पर्याय ठरणार नाही. तर नवीन नेता निवडीपर्यंत ते काळजीवाहू पंतप्रधान असणार आहेत.

Justin Trudeau

खासदारांकडून होता अनेक दिवसांपासून राजीनाम्याचा दबाव

ट्रूडो यांच्यावर त्यांच्या लिबरल पक्षाच्या खासदारांकडून अनेक महिन्यांपासून पायउतार होण्यासाठी दबाव होता. 16 डिसेंबर रोजी अर्थमंत्र्यांनी आपले पद सोडल्यानंतर त्यांच्यावरील पद सोडण्याचा दबाव आणखी वाढला. यामुळे ट्रुडो एकाकी पडत गेले. दुसरीकडे, कॅनडामध्ये यावर्षी संसदीय निवडणुका होणार आहेत. ट्रुडो यांच्या राजीनाम्यानंतर नियोजित वेळेपूर्वी निवडणुका घेण्याची देखील शक्यता वर्तविली जात आहे.

कशी झाली होती राजीनाम्याची मागणी

गेल्या महिन्यात कॅनडाचे उपपंतप्रधान आणि अर्थमंत्री क्रिस्टिया फ्रीलँड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर ट्रुडो यांच्यावर राजीनामा देण्याचा दबाव आणखी वाढला. क्रिस्टिया यांनी सांगितले की, ट्रुडो यांनी त्यांना अर्थमंत्री पद सोडून दुसऱ्या मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारण्यास सांगितले होते. फ्रीलँडच्या राजीनाम्यापासून, ट्रूडो मीडिया ब्रीफिंग किंवा कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमापासून दूर राहिले आहेत आणि त्यांचा बहुतेक वेळ त्यांच्या रिसॉर्टमध्ये घालवत आहेत.

ट्रुडो यांच्याकडे बहुमत नाही

कॅनडाच्या संसदेच्या हाउस ऑफ कॉमन्समध्ये लिबरल पक्षाचे 153 खासदार आहेत. कॅनेडियन हाउस ऑफ कॉमन्समध्ये 338 जागा आहेत. यामध्ये बहुमताचा आकडा 170 आहे. गेल्या वर्षी, ट्रुडो सरकारचा सहयोगी असलेल्या न्यू डेमोक्रॅटिक पार्टीने (एनडीपी) आपल्या 25 खासदारांचा पाठिंबा काढून घेतला होता. एनडीपी हा खलिस्तान समर्थक कॅनडाचे शीख खासदार जगमीत सिंग यांचा पक्ष आहे.

युती तुटल्यामुळे ट्रुडो सरकार अल्पमतात आले. मात्र, 1 ऑक्टोबर रोजी झालेल्या बहुमत चाचणीत ट्रुडो यांच्या लिबरल पक्षाला दुसऱ्या पक्षाचा पाठिंबा मिळाला. यामुळे ट्रुडो यांनी फ्लोअर टेस्ट पास केली. ट्रुडो यांच्या विरोधी कंझर्व्हेटिव्ह पक्षाकडे 120 जागा आहेत.

मात्र, न्यू डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते जगमीत सिंग यांनी पीएम ट्रुडो यांच्याविरोधात पुन्हा अविश्वास प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतला आहे. जगमीत सिंग यांनी गेल्या महिन्यात सांगितले होते की, पुढील महिन्यात अल्पसंख्याक उदारमतवादी सरकार पाडण्यासाठी पावले उचलू जेणेकरून देशात नव्याने निवडणुका घेता येतील. 27 जानेवारीपासून कॅनडामध्ये संसदीय कामकाज सुरू होणार आहे.

ट्रुडो विरुद्ध नाराजी का आहे

  • कॅनडात सातत्याने होत असलेल्या वाढत्या महागाईमुळे ट्रुडो यांच्या विरोधात कॅनेडियन लोकांमध्ये नाराजी आहे. याशिवाय कॅनडात कट्टरतावादी शक्तींचा उदय, स्थलांतरितांची वाढती संख्या आणि कोविड-19 नंतर निर्माण झालेली परिस्थिती यामुळे ट्रुडो यांना काही काळ राजकीय आव्हानांचा सामना करावा लागत आहे.
  • गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये केलेल्या इप्सॉस सर्वेक्षणात, फक्त 28% कॅनेडियन लोक म्हणाले की ट्रूडो यांनी पुन्हा निवडणूक लढवावी. एंगस रीड इन्स्टिट्यूटच्या मते, ट्रूडो यांचे मान्यता रेटिंग 30% पर्यंत घसरले आहे. दुसरीकडे, त्यांना नापसंत करणाऱ्या लोकांची संख्या 65% वर पोहोचली आहे.

कॅनडामध्ये या वर्षी निवडणुका होणार

  1. कॅनडामध्ये 2025 मध्ये पंतप्रधानपदासाठी निवडणूक होणार आहे. ऑक्टोबरपूर्वी या निवडणुका होतील. पंतप्रधान ट्रुडो म्हणाले की, पुढची निवडणूक लढवण्यासाठी लिबरल पक्षाचे नेतृत्व करण्याची त्यांची योजना आहे. मात्र, पक्षाच्या अनेक नेत्यांना ट्रुडो पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून आवडत नाहीत.
  2. ट्रुडो चौथ्यांदा पंतप्रधानपदावर दावा करत आहेत. कॅनडात गेल्या 100 वर्षात एकाही पंतप्रधानाने सलग चार वेळा निवडणूक जिंकलेली नाही. ट्रुडो यांच्या लिबरल पक्षाला संसदेत स्वबळावर बहुमत नाही.
  3. माजी पंतप्रधान पियर ट्रूडो यांचा मोठा मुलगा जस्टिन ट्रूडो 2013 मध्ये लिबरल पक्षाचा प्रमुख बनला. यानंतर त्यांनी 2015 मध्ये पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. उदारमतवादी नेता म्हणून आपली ओळख निर्माण करण्यात ते यशस्वी झाले होते.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+