Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

खलिस्तानवाद्यांना जोर का झटका! भारतविरोधी जगमीत सिंगचा खेळ संपला, कॅनडा निवडणुकीने नवा इतिहास रचला!

Canada Election Results 2025, Jagmeet Singh lost electin : कॅनडामधील सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल आज लागत आहेत. सुरुवातीच्या निकालांमध्येच या ठिकाणी पंतप्रधान मार्क कार्नी यांचा लिबरल पक्ष बहुमताकडे वाटचाल करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. लिबरल पार्टी सुमारे 165 जागांवर आघाडीवर आहे.

तर या निवडणुकीत आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. यामध्ये प्रामुख्याने भारतविरोधी खलिस्तानी नेते जगमीत सिंग यांचा दारुण पराभव झाला आहे. तर त्यांच्या पक्षाची देखील वाताहत या निवडणुकीच्या निकालात पाहायला मिळत आहे. एकंदरीत जी परिस्थिती पाहता, कॅनडामध्ये आता खलिस्तानी समर्थकांचा पक्ष एनडीपीची पुरती वाट लागली आहे. खलिस्तानी समर्थकांसाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.

Canada Election 2025

(Photo Credit By - Jagmeet Singh Facebook)

जगमीत सिंग यांनी दिला पक्ष प्रमुखाचा राजीनामा!

न्यू डेमोक्रॅटिक पार्टी (NDP) चे नेते जगमीत सिंग बर्नाबी हे मध्य मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. परंतु, नुकत्याच काही माध्यमांच्या अहवालानुसार त्यांचा पराभव झाल्याचे समोर आले. त्यानंतर स्वत: जगमीत सिंग यांनी पराभव झाल्याचे विधान केले. तर हा पराभव आम्ही स्वीकरला. या पराभवानंतर एनडीपी नेतेपदाचा जगमीत सिंग यांनी राजीनामा दिला. सुरुवातीच्या काही निकालांमध्ये त्यांचा एनडीपी पक्ष 7 जागांवर आघाडीवर होता. परंतु, अंतिम निकाल अद्याप लागलेले नाही. परंतु, जगमीत सिंग हे मात्र पराभूत झाले आहेत.

राष्ट्रीय पक्षाचा दर्जाही गमवावा लागणार!

या निवडणुकीत न्यू डेमोक्रॅटिक पार्टी अर्थात एनडीपीचा पाठिंबा कमी झाला. त्यामुळे पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जाही गमवावा लागला आहे. जगमीत यांनी पराभव स्वीकारताना म्हटले की, आपण जास्त जागा जिंकू शकलो नाही, याबद्दल मी खूप दु:खी आहे. पण मी आमच्या ध्येयधोरण व प्रचारासाठी प्रयत्न करणाऱ्यांमुळे अजिबात नाराज नाही. मी आमच्या पक्षाबद्दल आशावादी आहे. मला माहित आहे की, आपण नेहमीच भीतीपेक्षा भविष्यातील आशा निवडू. जगमीत सिंग हे गेल्या 8 वर्षांपासून एनडीपी पक्षाचे प्रमुख होते.

एनडीपीने किती जागा लढवल्या होत्या?

गेल्या निवडणुकीत पक्षाने 24 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे पक्षाला या निवडणुकीत देखील चांगल्या निकालाची अपेक्षा होती. यंदाच्या निवडणुकीत पक्षाने 343 जागांवर उमेदवार उभे केले होते. परंतु, त्यांना कोणत्याही ठिकाणी यश मिळालेले नाही. कॅनडामधील खलिस्तान समर्थकांसाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे.

लिबरल पार्टी पुन्हा सत्तेत, कार्नी PM बनणार!

दुसरीकडे, पंतप्रधान मार्क कार्नी यांचा लिबरल पक्ष पुन्हा एकदा सरकार स्थापन करणार आहे. आपल्या समर्थकांना संबोधित करताना कार्नी म्हणाले की, कॅनडाच्या सार्वभौमत्वाशी तडजोड केली जाणार नाही. जेव्हा मी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासोबत बसेन, तेव्हा ते दोन सार्वभौम राष्ट्रांमधील भविष्यातील आर्थिक आणि सुरक्षा संबंधांवर चर्चा करेल. आपण इतिहासाच्या एका वळणावर आहोत. हळूहळू एकात्मतेवर आधारित अमेरिकेशी असलेले आपले जुने संबंध आता संपले आहेत. अमेरिकेच्या विश्वासघाताच्या धक्क्यातून आपण सावरलो आहोत, परंतु आपण धडे विसरू नये.

कोणता पक्ष किती जागांवर आहे आघाडीवर!

लिबरल पार्टी 167 जागांवर आघाडीवर आहे तर कंझर्व्हेटिव्ह पार्टी 145 जागांवर आघाडीवर आहे. ब्लॉक क्वेबेकोइस पार्टी 23 जागांवर, एनडीपी 7 जागांवर आणि ग्रीन पार्टी एका जागेवर आघाडीवर आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+