चांदीच चांदी, ब्रिटनच्या पंतप्रधानांना मिळतो 'एवढा' पगार
British PM Salary : ब्रिटनमध्ये 650 जागांच्या हाउस ऑफ कॉमन्समध्ये मजूर पक्षाने 410 जागा जिंकल्या आहेत. येथे बहुमतासाठी 326 जागांची आवश्यकता आहे. मजूर पक्षाने 410 जागा जिंकल्या आहेत. मजूर पक्षाचे केयर स्टार्मर हे पंतप्रधानाच्या शर्यतीत आहेत.

भारतात नुकत्याच लोकसभा निवडणूका झाल्या. त्यात भाजपने 400 चा आकडा पार करण्याचा नारा दिला होता. तो साधता आला नाही, मात्र ब्रिटनच्या निवडणुकीत मजूर पक्षाने 400 चा आकडा पार केला आहे.
ऋषी सुनक यांचा कंझर्व्हेटिव्ह पक्ष 119 जागांवर मर्यादित असल्याचे दिसत आहे. गेल्या निवडणुकीपेक्षा कंझर्व्हेटिव्ह पक्षाला यावेळी 250 जागा कमी मिळाल्या. ब्रिटनमध्ये सुनक यांच्यानंतर आता लेबर पार्टीचे केयर स्टार्मर देशाचे पुढील पंतप्रधान होऊ शकतात. पंतप्रधान म्हणून केयर स्टारर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. लवकरच ते पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. मतदानाच्या निकालानंतर त्यांनी मतदारांचे आभार मानले. अशा परिस्थितीत स्टार्मर यांना पंतप्रधान म्हणून किती पगार मिळेल असा प्रश्न तुम्हाला पडत असेल. तर आम्ही तुमच्यासाठी संपूर्ण माहिती घेऊन आलो आहोत.
पंतप्रधानांना एवढा मिळतो पगार
खासदार म्हणून पंतप्रधानांना दरमहा 91346 पौंड पगार मिळतो. तसेच पंतप्रधान म्हणून दरमहा 80807 पौंड पगार दिला जातो. हे दोन्ही मिळून पंतप्रधानांना दर महिन्याला १,७२,१४७ पाउंड मिळतात. जर आपण भारतीय रुपयात बोललो तर पंतप्रधानांना दर महिन्याला अंदाजे 8.70 लाख रुपये मिळतात. तर भारताच्या पंतप्रधानांना दरमहा १.६६ लाख रुपये पगार मिळतो.
या सुविधाही उपलब्ध
पंतप्रधानांना कर भरावा लागतो आणि कोणत्याही सामान्य नागरिकाप्रमाणे राष्ट्रीय विमा घ्यावा लागतो. यासोबतच पंतप्रधानांनाही अनेक सुविधा मिळतात. पंतप्रधान 10 डाऊनिंग स्ट्रीट येथील पंतप्रधानांच्या निवासस्थानी राहतात, त्यांना कार आणि विमानाची सुविधा मिळते. ऋषी सुनक यांच्याबद्दल सांगायचे तर, त्यांना पंतप्रधान म्हणून मिळणारा पगार त्यांच्यासाठी पॉकेटमनीसारखा आहे. पत्नी अक्षता मूर्तीसह त्यांची एकूण संपत्ती 651 दशलक्ष पौंड आहे जी इंग्लंडच्या राजापेक्षा जास्त आहे.












Click it and Unblock the Notifications