डोनाल्ड ट्रम्प यांची दादागिरी थांबणार! मोदी, पुतिन आणि शी जिनपिंग भेटणार, अमेरिकेचे 'तेल' काढणार!
अमेरिका रशियन तेलाच्या खरेदीवरून भारतावर दबाव टाकत असताना, भारत, चीन आणि रशिया यांच्यात लवकरच त्रिपक्षीय बैठक होण्याची शक्यता आहे. नवी दिल्लीतील रशियन दूतावासाने बुधवारी या बैठकीची आशा व्यक्त केली. अमेरिकेच्या दबावाला आणि भारताच्या रशियन कच्च्या तेलाच्या खरेदीवर बोलताना रशियाने हे स्पष्ट केले. रशियाचे नवी दिल्लीतील उपप्रमुख रोमन बाबुश्किन यांनी सांगितले की, बाह्य दबाव असूनही, भारत आणि रशियामधील ऊर्जा सहकार्य सुरू राहील, असा मॉस्कोला विश्वास आहे.
अमेरिकेचा दुहेरी दबाव
रशियाकडून तेल खरेदी केल्यास अमेरिका भारतावर २८ ऑगस्टपासून २५% अतिरिक्त शुल्क लादणार आहे. विशेष म्हणजे, रशियन तेलाचे मोठे खरेदीदार असलेल्या चीनवर मात्र असे कोणतेही शुल्क लावण्यात आलेले नाही. या दुहेरी धोरणामुळे अमेरिकेची दादागिरी दिसून येते.
बाबुश्किन यांनी हे मान्य केले की, ही परिस्थिती भारतासाठी आव्हानात्मक आहे. मात्र, ते म्हणाले की रशियाला नवी दिल्लीशी असलेल्या संबंधांवर पूर्ण विश्वास आहे. त्यांनी असेही म्हटले की, पाश्चात्त्य निर्बंध ज्या देशांनी लादले आहेत, त्यांनाच उलट नुकसान पोहोचवत आहेत.

मोदी-पुतिन भेटण्याची शक्यता
बाबुश्किन यांनी सांगितले की, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन या वर्षाच्या अखेरीस नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्याची अपेक्षा आहे. मात्र, तारखा अजून निश्चित झालेल्या नाहीत. रशियाकडून भारताची कच्च्या तेलाची आयात सध्याच्या पातळीवरच राहील, याची खात्री त्यांनी दिली. नायरा रिफायनरीला रशियाच्या रोझनेफ्टकडून थेट तेल पुरवठा होतो, त्यामुळे तिला कोणतीही अडचण येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जयशंकर यांचा रशिया दौरा
भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर सध्या तीन दिवसांच्या मॉस्को दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांसह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. ही भेट भारत-रशिया संबंधांना अधिक मजबूत करेल.
बाबुश्किन यांनी जागतिक भू-राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना म्हटले की, जागतिक अशांततेच्या काळात 'ब्रिक्स' (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका) ची भूमिका अधिक महत्त्वाची होईल. आगामी त्रिपक्षीय बैठक अमेरिकेच्या दादागिरीला उत्तर देण्यासाठी एक मजबूत आघाडी तयार करू शकते, असे जाणकारांचे मत आहे.












Click it and Unblock the Notifications