ब्राझीलमध्ये विमान अपघात, 61 लोकांचा मृत्यू, अपघाताचा भयानक व्हिडीओ कॅमे-यात कैद
Brazil Plane Crash: ब्राझीलच्या साओ पाउलोजवळ शुक्रवारी दुपारी एक प्रादेशिक टर्बोप्रॉप विमान कोसळले आहे. या घटनेत विमानातील सर्व 61 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रादेशिक विमान वाहतूक कंपनी व्होपसने सांगितले की, विमान पराना राज्यातील कॅस्केव्हल येथून उड्डाण केल्यानंतर साओ पाउलोच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे निघाले होते.
दुपारी 1:30 वाजता (1630 GMT), साओ पाउलोपासून सुमारे 80 किमी. (50 मैल)विन्हेदो शहराच्या उत्तर-पश्चिम भागात हे विमान क्रॅश झाले. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे की ATR-72 विमानाचे नियंत्रण सुटले आणि ते हवेत गरगर फिरून घराजवळील झाडांवर पडले, त्यानंतर काळ्या धुराचे प्रचंड लोट उठले.

घटनास्थळाजवळील रहिवासी डॅनियल डी लिमा या स्थानिक रहिवाशाने या अपघाताचे वर्णन केले, की त्याने मोठा आवाज ऐकला, त्यानंतर त्याने विन्हेडो येथील त्याच्या अपार्टमेंटच्या बाहेर पाहिले, जेथे विमान आकाशात गरगर फिरत होते. त्यांनी सांगितले की विमान आकाशातून पडले आणि मोठा स्फोट झाला. डी लिमा म्हणाले की, विमानाच्या पायलटने दाट लोकवस्ती असलेला जवळचा परिसर टाळण्याचा प्रयत्न केला.
अधिकारी म्हणाले- कोणीही वाचले नाही
विन्हेडोजवळील वेलिनहोस येथील पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले की, अपघातात कोणीही वाचले नाही. स्थानिक कॉन्डोमिनियम कॉम्प्लेक्समधील फक्त एका घराचे नुकसान झालं.मात्र कोणतेही रहिवासी जखमी झाले नाहीत.
अपघात कसा झाला?
अधिकाऱ्यांनी अद्याप अपघाताचे कारण सांगितलेले नाही. ब्राझीलच्या विमान अपघात तपास केंद्राचे प्रमुख सेनिपा यांनी सांगितले की, विमानाचा तथाकथित 'ब्लॅक बॉक्स', ज्यामध्ये ध्वनी रेकॉर्डिंग आणि उड्डाणाचा डेटा आहे, घटनास्थळावरून जप्त करण्यात आला आहे. अपघाताच्या व्हिडिओमध्ये स्वच्छ हवामान दिसले आणि परिसरात हलका पाऊस आणि 10 किमी/तास (6 मैल प्रतितास) वेगाने वारे वाहण्याचा अंदाज होता.
🚨🇧🇷Major plane crash in Brazil!
— James Rizk (@JamesRizk1) August 9, 2024
Expected dead 58 Passengers and 4 crew!
Plane exploded near houses but no people damaged yet on the ground hopefully.
More updates to come! pic.twitter.com/tgX4MS29ig












Click it and Unblock the Notifications