Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पाकिस्तानच्या क्वेटामध्ये बॉम्बस्फोट,10 ठार; 30 दिवसांत 3री घटना; राष्ट्रपती झरदारींचा भारतावर आरोप!

Balochistan Quetta Bomb Blast Update : पाकिस्तानचा अशांत प्रांत बलुचिस्तानची राजधानी क्वेटा येथे मंगळवारी (30 सप्टेंबर 2025) Frontiere Corps (FC) मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला झाला.

या शक्तिशाली कार बॉम्बस्फोटाने हा प्रांत पुन्हा एकदा हादरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या आत्मघाती हल्ल्यात किमान १० जण ठार आणि ३२ जण जखमी झाले. स्फोटानंतर सुरक्षा दलांनी तातडीने केलेल्या कारवाईत चार कथित दहशतवाद्यांना ठार मारले.

balochistan quetta bomb blast

क्वेटा: बंडखोरीचा 'हॉटस्पॉट'

क्वेटा हे पाकिस्तानच्या नैऋत्य प्रांताची राजधानी आहे, जे अफगाणिस्तान आणि इराणच्या सीमेवर आहे. हिंदूकुश पर्वतरांगांनी वेढलेले हे शहर धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचे असले तरी, ते बलुच फुटीरतावादी गट (उदा. BLA) आणि तालिबान-संबंधित अतिरेकी गट (उदा. TTP) यांचा बालेकिल्ला राहिले आहे.

या प्रांताला धोरणात्मक महत्त्व!

बलुचिस्तानमध्ये नैसर्गिक संसाधने (गॅस, तेल) आणि ग्वादर बंदर यांसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांवरून बंडखोरी पसरली आहे. क्वेटा शहर अनेकदा या बंडखोरीचे लक्ष्य ठरते. हा हल्ला FC (फ्रंटियर कॉर्प्स) मुख्यालयाजवळ झाला, जो क्वेटाच्या झरघून रोडवर मॉडेल टाउन आणि हाली रोडजवळील वर्दळीचा भाग आहे. FC मुख्यालय हे सुरक्षा दलांचे एक प्रमुख केंद्र आहे.

कार बॉम्बने साधला 'दहशत'

मंगळवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास स्फोटकांनी भरलेली एक कार FC मुख्यालयाच्या दिशेने वळत असताना हा स्फोट झाला. स्फोट इतका शक्तिशाली होता की जवळच्या इमारतींच्या खिडक्या हादरल्या आणि परिसरात धुराचे लोट पसरले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्फोटानंतर कारचे तुकडे झालेले दिसले. स्फोट होताच परिसरात गोळीबार सुरू झाला, लोक घाबरून पळू लागले आणि बाजारपेठांमध्ये गोंधळ उडाला.

सुरुवातीला हा आत्मघातकी हल्ला असल्याचे मानले गेले, मात्र बलूच लिबरेशन आर्मी (BLA) किंवा तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) यापैकी कोणत्याही गटाने लगेच जबाबदारी स्वीकारली नाही.

मृत्यू आणि आरोग्य आणीबाणी

बलुचिस्तानचे आरोग्य मंत्री बख्त मुहम्मद काकर यांनी हल्ल्यात १० जण ठार आणि ३२ जण जखमी झाल्याची पुष्टी केली. जखमींना क्वेटा सिव्हिल हॉस्पिटल आणि ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आले. आरोग्य विभागाने तातडीने क्वेटामधील सर्व प्रमुख रुग्णालयांमध्ये आणीबाणी जाहीर केली आणि सर्व डॉक्टर्स, परिचारिका तसेच पॅरामेडिक्सना ड्युटीवर बोलावले.

सुरक्षा दलांची कारवाई आणि मंत्र्यांचा संशय

मुख्यमंत्री मीर सरफराज बुगती यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत याला "दहशतवादी हल्ला" म्हटले. सुरक्षा दलांनी तातडीने प्रतिसाद देत परिसरात कोम्बिंग ऑपरेशन (शोधमोहीम) सुरू केले आणि चार दहशतवाद्यांना ठार केले.

लक्ष्य मंत्री होते का?

स्फोटाचे मुख्य लक्ष्य FC मुख्यालय असल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे, कारण जखमींमध्ये बहुतेक नागरिक आणि FC कर्मचारी होते. तरीही, बलुचिस्तानमध्ये राजकीय व्यक्तींना लक्ष्य करण्याची प्रवृत्ती पाहता हा हल्ला एखाद्या मंत्र्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न होता का, यावर संशय कायम आहे आणि तपास सुरू आहे.

राष्ट्रपतींची काय दिली प्रतिक्रिया!

राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी हल्ल्याचा निषेध करताना सुरक्षा दलांचे कौतुक केले आणि दहशतवादी शक्तींना "फितना-अल-खवारीज" (TTP संबंधित) संबोधले, ज्यांचा अजेंडा 'भारत समर्थक' आहे, असे म्हणत भारतावर आरोप केला.

३० दिवसांत बॉम्बस्फोटांची 'हॅट्रिक'

क्वेटा आणि बलुचिस्तानमधील अस्थिरतेचे प्रतिबिंब अलीकडील घटनांच्या टाइमलाइनवरून स्पष्ट होते.

  • २ सप्टेंबर २०२५: माजी मुख्यमंत्री अख्तर मेंगल यांच्या ताफ्यावर हल्ला झाला.
  • ४ सप्टेंबर २०२५: एका राजकीय रॅलीजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात १५ जण ठार झाले.
  • ३० सप्टेंबर २०२५: FC मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+