तालिबान सरकारच्या मंत्र्यासह 12 जण ठार, मंत्रालयाच्या आवारातच झाला स्फोट

तालिबानचे मंत्री खलील रहमान हक्कानी यांच्यासह त्यांच्या तीन अंगरक्षकांचा मंत्रालयाच्या आवारात झालेल्या स्फोटात मृत्यू झाला. स्फोटातील मृतांचा आकडा आता १२ वर पोहोचला आहे. अफगाणिस्तानच्या काबूलमध्ये बुधवारी हा स्फोट झाला. हक्कानी हे आपल्या विदेशी पाहूण्यांना भेटण्यासाठी जात असतानाच हा स्फोट घडवून आणण्यात आला.

Explosion in Taliban

मंत्रालयाच्या आवारातच स्फोट

काबूलमधील निर्वासित मंत्रालयाच्या आवारात हा स्फोट झाला. हक्कानी हे खोस्तवरुन येणाऱ्या काही पाहुण्यांना भेटण्यासाठी जात होते. त्यावेळी मंत्रालयाच्या आवारात हा भीषण स्फोट झाला. तालिबान सरकारने 'द खोरासान डायरी'शी बोलताना या घटनेबाबत माहिती दिली आहे. या स्फोटात मंत्री हक्कानी यांच्यासह बारा लोकांचा मृत्यू झाला. मात्र अद्याप या स्फोटाची जबाबदारी कुणीही घेतलेली नाही.

आत्मघाती हल्ल्याचा संशय

राजधानी काबूलमध्ये मंत्रालयाच्या आवारात स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा स्फोट कोणी घडवून आणला, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार हा आत्मघाती हल्ला होता असेही बोलले जात आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार या स्फोटात हल्लेखोराचाही मृत्यू झाला आहे. तसेच जवळपास असणारे अनेक लोकं जखमी झाले आहेत.

मृत हक्कानी होते मंत्री

या हल्ल्यात मृत्यू झालेले खलील रहमान हक्कानी हे तालिबानचे अंतर्गत मंत्री सिराजुद्दीन हक्कानी यांचे काका होते. शिवाय ते तालीबानच्या नेटवर्कमधील एक प्रमुख व्यक्ती होते. दोन वर्षांपूर्वी ऑगस्ट 2021 मध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आली. त्यानंतर 7 सप्टेंबर 2021 रोजी निर्वासितांचे कार्यवाहक मंत्री म्हणून हक्कानी यांची नियुक्ती करण्यात आली होती.

ISIS वर आहे संशय

सध्या तालीबानमध्ये संघर्ष सुरु आहे. इस्लामिक स्टेट आणि तालिबान यांच्यातील वातावरण दूषित आहे. त्यामुळे हा हल्ला इसिसकडून केला गेला असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. तालीबानमध्ये यापूर्वी इस्लामिक स्टेट (ISIS-K)ने वारंवार असे हल्ले केले आहेत. तालीबीन सोबतचा आयएसआयएसचा संघर्ष पाहता हा हल्लाही त्यांनीच केला असल्याची माहिती मिळत आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+