बांगलादेशातील परिस्थिती चिघळली; दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश..!
बांगलादेश मध्ये विद्यार्थ्यांनी सरकारी नोकरी मधील आरक्षणावरून एक जुलैपासून आंदोलन सुरू केले होते. मात्र या आंदोलनाला हिंसक वळण लागले आणि जाळपोळ,तोडफोड सुरू झाली.हिंसाचार रोखण्यासाठी पोलिसांनी शनिवारी संपूर्ण बांगलादेशात संचारबंदी लागू केली असून, लष्करी दलांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
बांगलादेशमधील विद्यापीठांमधून सुरु झालेल्या हिंसाचाराचे लोन आता संपूर्ण देशभरात पसरले आहे. बांगलादेशमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर हिंसाचार पहायला मिळत असून सध्या परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सरकारकडून केले जात आहेत. बांगलादेशमध्ये नोकऱ्यांमधील आरक्षणावरून सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर हे निषेध आंदोलन आणि हिंसाचार घडत असून त्यामध्ये जवळपास 105 जणांचा मृत्यू झाला आहे.

सध्या बांगलादेशमध्ये देशव्यापी कर्फ्यू लागू करण्यात आला असून त्याची मुदत आणखी वाढवण्यात आली आहे. सध्या रस्त्यावर कुणी आल्यास त्याला 'दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे' आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत.
..तर गोळीबाराचे आदेश
नागरी सेवेतील नोकऱ्यांबाबतचे आरक्षण रद्द करायचा की नाही प्रकरणासंदर्भात आज 21जुलै रोजी सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. या आरक्षणावरुनच सध्या बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरु आहे. हे आरक्षण रद्द करण्यात यावे, अशी आंदोलकांची मागणी आहे. या संघर्षांमध्ये आतापर्यंत किमान 105 लोकांचा मृत्यू झाला आहे.
वाढती अशांतता थांबवण्यासाठी गेल्या शुक्रवारी संपूर्ण बांगलादेशात कडक संचारबंदी लागू करण्यात आली होती. काल शनिवारी दुपारी संचारबंदी थोडक्यात उठवण्यात आली मात्र, आता पुन्हा एकदा संचारबंदीमध्ये वाढ करण्यात आली आहे. सत्ताधारी अवामी लीग पक्षाचे सरचिटणीस ओबेदुल कादर यांनी वृत्तसंस्था एएफपीला सांगितले की, कर्फ्यूचे उल्लंघन करणाऱ्यांवर गोळीबार करण्याचे अधिकार पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या आंदोलनाची झळ संपूर्ण देशाला बसली आहे.
हजारो भारतीय विद्यार्थी मायदेशी परतले
देशातील परिस्थितीचा विचार करता सरकारच्या वतीने रविवारी आणि सोमवारी देशात सार्वत्रिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. शनिवारी त्याबाबतची अधिसूचना काढण्यात आली. या दरम्यान सरकारी, निमसरकारी, खासगी आणि स्वायत्त संस्थांची कार्यालयं पूर्णपणे बंद ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत












Click it and Unblock the Notifications