भारताचा नवा शत्रू तयार..? बांग्लादेश चीनकडून करतंय 16 फायटर जेटची खरेदी
भारताने बांग्लादेशवर यापूर्वी अनेक उपकार केले आहेत. मात्र आता तेथे सत्ताबदल झाल्यावर धर्मांधांच्या हातात सत्तेच्या चाव्या आल्या आहेत. नव्या बदलत्या राजकीय समिकरणामुळे बांग्लादेश हा भारताचा भविष्यातील शत्रू ठरण्याची भिती राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. नुकतीच भारताचं टेन्शन वाढविणारी बातमी आता समोर आली आहे.

चीनकडून फायटर जेटची खरेदी
बांगलादेश चीनकडून Chengdu J-10C मल्टीरोल फायटर जेट खरेदी करण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात 16 J-10C लढाऊ विमाने खरेदी करण्याची बांगलादेशची योजना आहे. बांगलादेशात हिंदूवर वाढते हल्ले आणि भारत विरोधी कारवाया सुरु असताना, ही बातमी आली आहे. तज्ज्ञांच्या मते भारताची चीन वाढती जवळीक भारतासाठी भविष्यात मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. काही बातम्यानुसार, बांगलादेशच्या एअर फोर्सचे एअर चीफ मार्शल हसन महमूद खान यांनी सांगितले की, आम्ही फायटर जेट आणि लढाऊ हॅलिकॉप्टर मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत.
भारताचे उपकार विसरला
भारताने यापूर्वी बांग्लादेशवर अनेक उपकार केले आहेत. आता भारताशी नव्याने दुश्मनी करणे बांग्लादेशाला महागात पडू शकते. बांगलादेशाला कोणतीही समस्या आली, तर भारत सर्वात आधी मदत करु शकतो. चीन आणि पाकिस्तानची सीमा त्यांच्या देशाला लागून नाही. बांग्लादेशची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात भारतावर अवलंबून आहे. बांगलादेशाच्या सर्वात मोठा टेक्सटाईल उद्योगाच्या कच्चा माल भारतातून जातो. भारत बांगलादेशाला एनर्जी, गॅस आणि तेल पुरवितो यात जर भारताने कठोर धोरण स्वीकारले तर बांग्लादेशाला ते महाग पडू शकते असे संरक्षण तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
चीनने साधला स्वार्थ
चीनचे भारतासोबत संबंध पूर्वीपासून चांगले राहिलेले नाहीत. आता बांग्लादेशला मदत करुन चीन आपला स्वार्थ साधताना दिसत आहे. बांग्लादेश ही शस्त्रास्त्रे भारताविरोधात वापरु शकतो हे चीनला माहित आहे. तरी तो बांग्लादेशला शस्त्रास्त्रे व फायटर जेट देण्याच्या तयारीत आहे. बांगलादेशातील ८० टक्के शस्त्रास्त्रे चीनमधून आयात होतात. यात पाकिस्तानची देखील बांगलादेशावर दादागिरी आहे. चीनला तर फायदाच आहे. बांग्लादेश आणि चीनच्या डिफेन्स करारात अनेक समस्या देखील आलेल्या आहेत. आधीही चीनकडून आलेल्या शस्रास्रांवर बांगलादेश नाराज राहीलेला आहे.












Click it and Unblock the Notifications