बांग्लादेश हिंसाचार : शेख हसीना बांगलादेशातून विमानाने भारतात आल्या, लंडनला जाण्याच्या तयारीत
नवी दिल्ली - बांग्लादेशातील हिंसक निदर्शनादरम्यान सुमारे तीनशे जणांचा मृत्यू झाला. अजूनही बांग्लादेश हिंसाचारानं धुसमत आहे. याच धर्तीवर बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आज राजीनामा दिला आहे. दरम्यान त्या लष्करी विमानाने भारतात आल्या.
शेख हसीना दिल्लीजवळच्या हिंडन एअरबेसवर उतरल्या असून त्या लंडनला जाण्याच्या तयारीत आहेत असे सूत्रांनी सांगितले. या राजीनाम्यासह बांग्लादेशात आज सत्ताधारी शेख हसिना सरकार पडलं असून विशेष बाब म्हणजे तीनशे जणांच्या मृत्यूनंतर शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला.

एका उच्चपदस्त लष्करी अधिकाऱ्याने सांगितले की, शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांचा 15 वर्षांचा सत्ता कार्यकाळ संपला आहे. 300 हून अधिक लोकांचा मृत्यू झालेल्या सरकारविरोधी हिंसाचाराच्या आठवड्यांनंतर त्यांचा राजीनामा आला आहे. संतप्त जमावाने त्यांचे शासकीय निवासस्थान गणभवनमध्ये घुसून ते ताब्यात घेतले आहे.
लोकांकडून जल्लोष
शासकिय निवासस्थानी घुसल्यानंतर आंदोलक फ्रीजमधून अन्न बाहेर काढत आहेत. आंदोलकांनी एसी, कुलर, खुर्ची, टेबल, सोफा बाहेर काढून जल्लोष केला. मोटारसायकल आणि रिक्षाने ते पंतप्रधानांच्या निवासस्थानी आले.
भारतात आश्रयाची आशा!
शेख हसीना आणि त्यांची बहीण शेख रेहाना 'सुरक्षित आश्रयस्थानी' निघून गेल्याचे वृत्त होतं. बांगलादेशचे लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-झमान म्हणाले की, अंतरिम सरकार कार्यभार स्वीकारेल. स्थानिक माध्यमांनुसार, दिवसभरात त्यांनी सत्ताधारी अवामी लीग आणि विरोधी बीएनपी यासह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांशी आणि इतरांशी संवाद साधला. शेख हसीना या नेमक्या कुठे आहेत, यासंदर्भात त्यांचा ठावठिकाणा त्वरित निश्चित होऊ शकला नाही.
शेख हसिना भारतात आल्या..
वृत्तानुसार, शेख हसिना आणि त्यांच्या बहिणीला लष्करी हेलिकॉप्टरमधून भारतात आणण्यात आले आहे. तर दुसरीकडे आंदोलक विद्यार्थ्यांनी बांगलादेशात जल्लोष साजरा केला आहे. जूनच्या उत्तरार्धात निदर्शने शांततेत सुरू होती, कारण विद्यार्थी सरकारी नोकऱ्यांमधील कोटा पद्धत रद्द करण्याची मागणी करत होते, परंतु आंदोलनाला हिंसक वळण लागले.
ढाका विद्यापीठात पोलिस आणि सरकारी समर्थक कार्यकर्ते यांच्यात हिंसक कृती झाली. यात 300 जण ठार झाले. दरम्यान पंतप्रधान शेख हसीना यांची 15 वर्षांची राजवट संपुष्टात आणण्याच्या मागण्या सुरू झाल्या होत्या












Click it and Unblock the Notifications