कझाकस्तानमध्ये विमान कोसळलं, 42 जण ठार, 25 जखमी, पाहा व्हिडिओ
Azerbaijan airlines plane crash : ख्रिसमसच्या दिवशी बाकूहून ग्रोझनीला जाणारे अझरबैजान एअरलाइन्सचे विमान पश्चिम कझाकस्तानमधील अकताऊजवळ कोसळलं आहे.. विमानातील 67 प्रवासी आणि पाच कर्मचाऱ्यांपैकी 42 जणांचा मृत्यू झाला. तर 25 जण वाचवण्यात यश मिळालं आहे.
एका व्हिडिओमध्ये विमान आगीच्या ज्वाळांनी वेढलेले आणि क्रॅश साइटवरून दाट काळा धूर निघत असल्याचे दिसून आले. कझाक परिवहन मंत्रालयाने या दुर्घटनेची पुष्टी करत टेलिग्रामवर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बाकू-ग्रोझनी मार्गावर चालणारे अझरबैजान एअरलाइन्सचे विमान अकताऊजवळ क्रॅश झालं आहे.

इमर्जन्सी लँडिंगचा प्रयत्न करत असताना ही दुर्घटना घडली. ज्याचा फ्लाइट क्रमांक J2-8243 होता. प्राथमिक अहवालानुसार खराब हवामान आणि ग्रोझनीमधील दाट धुक्यामुळे विमान अकताऊकडे वळवण्यात आले. दुर्दैवाने इमर्जन्सी लँडिंगचा प्रयत्न करताना अकताऊपासून अंदाजे 3 किलोमीटर अंतरावर विमान क्रॅश झाल्याची माहिती आहे.
अज़रबैजान एयरलाइंस का हवाई जहाज़ कजाकिस्तान में क्रैश हुआ!#airlines pic.twitter.com/136qrJ9nud
— Rahul Chaudhary (@rchaudhary_) December 25, 2024
रशियाच्या विमान वाहतूक प्राधिकरणाने आपल्या प्राथमिक तपासात पक्ष्यांची टक्कर झाल्याने अपघात झाल्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे पायलटला इमर्जन्सी लँडिंग करावे लागल्याचं म्हटलं आहे.अपघातातून बचावलेल्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बचावलेल्या 25 जणांपैकी 22 जणांना गंभीर अवस्थेत स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.












Click it and Unblock the Notifications