ऑस्ट्रेलियात 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरायला बंदी! कधीपासून किती लागणार दंड? वाचा
Australia bans children under 16 from using social media : सोशल मीडियाचे जेवढे फायदे तेवढे नुकसान अन् धोकेही आहेत. हे माध्यम कसे वापरायचे याचे भान नसल्याने 16 वर्षांखालील मुलांना सोशल मिडिया वापरण्यावर ऑस्ट्रेलियात बंदी घालण्यात आली आहे.
आपल्या तरुणांचे संभाव्य धोक्यांपासून संरक्षण करण्यासाठी ऑस्ट्रेलिया सरकारने हा कायदा लागू केला आहे या अंतर्गंत 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियाच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.

बंदी पुढील 12 महिन्यांपर्यंत लागू न केल्यास दंड
ऑस्ट्रेलियाच्या संसदेने जगातील सर्वात कठोर कायद्याला मंजुरी दिली आहे. ही बंदी पुढील 12 महिन्यांपर्यंत लागू न केल्यास सोशल मीडिया कंपन्यांना $50 दशलक्षपर्यंत दंड होऊ शकतो.
सोशल मीडियाच्या दुष्परिणामांपासून तरुणांचे संरक्षण करण्यासाठी हा कायदा आवश्यक असल्याचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी सांगितले. अनेक पालकांकडूनही याबाबत सातत्याने मागणी होत होती. मात्र, या बंदीची अंमलबजावणी कशी होते हे पाहणे बाकी आहे.
गोपनीयता आणि सोशल मीडिया कनेक्शनचा प्रभाव कसा हाताळला जाईल या प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळणे बाकी आहेत, या कायद्यानुसार बंदी घालण्यात येणारे विशिष्ट व्यासपीठ ओळखले गेले नसले तरी, असा अंदाज वर्तवला जात आहे की स्नॅपचॅट सारख्या लोकप्रिय सोशल मीडिया साइट्स , TikTok, Facebook, Instagram आणि X बंदी अंतर्गत येतील.
कोणत्या प्लॅटफॉर्मवर बंदी घातली जाईल हे ऑस्ट्रेलियाचे संपर्क मंत्री ठरवतील. विशेष म्हणजे या बंदीमध्ये गेमिंग आणि मेसेजिंग प्लॅटफॉर्म तसेच खात्याशिवाय ॲक्सेस केलेल्या वेबसाइट्सचाही समावेश आहे. मात्र, याचा यूट्यूबवर परिणाम होणार नसल्याचे मानले जात आहे.
विरोधी पक्षनेते सेन मारिया यांनी हा कायदा आवश्यक असल्याचे सांगितले. सोशल मीडिया मुलांचे अकाऊंट्स ओळखणे आणि हटवणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. सोशल मीडिया कंपन्यांना ही जबाबदारी आधीच पार पाडायची होती, मात्र या कंपन्या केवळ आपला नफा बघतात. ऑस्टेलियात सोळा वर्षाखालील मुलांना सोशल मिडिया वापरायला बंदी संभाव्य धोके टाळण्यासाठी कायदा लागू केला जात आहे.












Click it and Unblock the Notifications