ट्रम्प यांच्यासमोर भगवद्गगीतेवर हात ठेऊन शपथ घेणारे काश पटेल कोण आहेत, FBIमध्ये त्यांचा रोल काय?
Who is Kash Patel : अमेरिकेची सर्वात मोठी तपास संस्था म्हणून ओळख असलेल्या एफबीआय (फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन) मध्ये आता भारतीय वंशाचा व्यक्ती प्रमुख असणार आहे. भारतीय वंशाचे काश पटेल यांनी नुकताच एफबीआयच्या संचालपदाचा पदभार स्वीकारला. त्यावेळी त्यांनी भगवद्गगीतेवर हात ठेऊन शपथ घेतली. विशेष म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीत काश पटेल यांनी एफबीआयचे 9 वे संचालक म्हणून शपथ घेतली. काश पटेल यांनी घेतलेल्या शपथेची आता चर्चा सुरू झाली असून नेमकं ते कोण आहेत, त्यांची एवढ्या मोठ्या तपास यंत्रणेवर प्रमुख म्हणून नियुक्ती कशी झाली. डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी त्यांचा संबंध कसे आहेत, जाणून घ्या सर्व काही.
काश पटेल यांचे कुटुंब आणि मैत्रीण देखील त्यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. त्यांना अमेरिकेचे अॅटर्नी जनरल पाम बोंडी यांनी शपथ दिली. ट्रम्प प्रशासनाच्या पहिल्या कार्यकाळात एफबीआय संचालक असलेले क्रिस्टोफर रे यांची जागा त्यांनी घेतली. व्हाईट हाऊसने एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट केले की एफबीआयला प्रामाणिकपणा आणि न्याय परत मिळवून देण्याची वेळ आली आहे. अमेरिका पुन्हा सुरक्षित करा!

Who is Kash Patel : काश पटेल कोण आहे?
काश पटेल हे भारतीय-अमेरिकन आहेत. ज्यांनी यापूर्वी न्याय विभागात दहशतवादविरोधी अभियोक्ता म्हणून काम केले आहे. त्यांनी अनेक हाय-प्रोफाइल प्रकरणे हाताळली आहेत आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित बाबींमध्ये ते तज्ज्ञ आहेत. त्यांचा जन्म अमेरिकेत भारतीय पालकांच्या पोटी झाला. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, संरक्षण विभाग आणि गुप्तचर संस्था यासह अनेक महत्त्वाची सरकारी पदे भूषवली.
एफबीआयकडे सर्वोत्तम संचालक - डोनाल्ड ट्रम्प
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काश पटेल यांच्या नियुक्तीचे कौतुक केले. ते म्हणाले की, मला वाटते की ते या पदावर काम करणारे आतापर्यंतचे सर्वोत्तम व्यक्ती म्हणून ओळखले जातील. एफबीआय एजंट्स त्याला खूप आवडतात. त्यांनी असेही म्हटले की काश पटेल हे एक कणखर, मजबूत आणि स्वतंत्र व्यक्ती असल्याने त्यांना सिनेटकडून मान्यता मिळणे खूप सोपे होते.
डेमोक्रॅट्स पक्षाने का आक्षेप घेतला?
तथापि, डेमोक्रॅटिक पक्षाचे अनेक नेते काश पटेल यांच्या नियुक्तीवर खूश नाहीत. त्यांना भीती आहे की पटेल हे ट्रम्प यांचे जवळचे सहकारी आहेत आणि ते राजकीय विरोधकांविरुद्ध एफबीआयच्या अधिकारांचा वापर करू शकतात. डेमोक्रॅट्सनी पटेल यांच्या भूतकाळातील विधानांचा हवाला दिला. ज्यात त्यांनी म्हटले होते की ते "ट्रम्पविरोधी कट रचणाऱ्यांविरुद्ध" कारवाई करतील. परंतु काश पटेल यांनी हे आरोप फेटाळून लावले आणि ते म्हणाले की ते संविधानानुसार काम करतील आणि कोणत्याही राजकीय सूडबुद्धीने काम करणार नाहीत.
काश पटेल काय बदल घडवू शकतात?
एफबीआयचे नवे संचालक म्हणून, काश पटेल संघीय तपास संस्थेत मोठे बदल करण्याची योजना आखत आहेत. राष्ट्रीय सुरक्षेसह गुन्हेगारी विरोधी मोहिमांवर अधिक लक्ष देईल. आम्ही वॉशिंग्टनमधील एफबीआयची उपस्थिती कमी करू आणि ती जमिनीवर अधिक सक्रिय करू. आम्ही ड्रग्ज, हिंसक गुन्हे आणि दहशतवादाविरुद्ध कारवाई तीव्र करू. जर कोणी अमेरिकेच्या सुरक्षेला धोका निर्माण केला तर आम्ही त्याला जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून शोधून योग्य ती कारवाई करू, असे प्रतिपादन काश पटेल यांनी केले.
भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेणारे पटेल हे पहिले भारतीय नाहीत
भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेणारे काश पटेल हे पहिले भारतीय-अमेरिकन नाहीत. यापूर्वी अमेरिकन काँग्रेस सदस्य सुभाष सुब्रमण्यम यांनीही गीतेवर शपथ घेतली होती.
काश पटेल एफबीआयला एक नवीन दिशा देतील का?
काश पटेल यांनी एफबीआयला राजकारणापासून दूर ठेवण्याचे आणि न्याय मिळण्याची खात्री करण्याचे आश्वासन दिले आहे. तथापि, त्यांच्या दीर्घकाळ ट्रम्प समर्थक विचारांमुळे डेमोक्रॅट्स त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. आता हे पाहणे बाकी आहे की तो एफबीआयमध्ये सुधारणा करू शकेल आणि ते अधिक निष्पक्ष बनवू शकेल का, की त्याच्यावरील आरोप खरे सिद्ध होतील?












Click it and Unblock the Notifications