Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

व्हाईट हाऊसजवळ गोळीबार? अमेरिकन गुप्तचर विभागाच्या चकमकीत एक जण ठार

अमेरिकेतली वॉशिंग्टनमधील व्हाईट हाऊसजवळ रविवारी मध्यरात्री अमेरिकन गुप्तचर एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे ही घटना घडली त्यावेळी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे प्लोरिडामध्ये होते. अमेरिकन गुप्तचर एजन्सीच्या म्हणण्यांनुसार या व्यक्तीने अधिकाऱ्यांना बंदूक दाखविल्यानंतर हा गोळीबार करण्यात आला.

American intelligence agency

मारलेला नागरीक इंडियानाचा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या व्यक्तीवर गोळ्या झाडण्यात आल्या तो इंडियानाहून आला होता. स्थानिक पोलिसांनी माहिती दिल्यानंतर गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी या व्यक्तीची कार व्हाईट हाऊसजवळ अडवली. गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीप्रमाणेच असणारा व्यक्ती या कारमध्ये अधिकाऱ्यांना दिसला. त्याच्याकडे चौकशी केली असता त्या व्यक्तीने अधिकाऱ्यांना बंदूक दाखवली.

संशयीताने दाखवली बंदूक

गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी या संशयिताची चौकशी केली असता, त्याने अधिकाऱ्यांना बंदूक दाखवली. त्या व्यक्तीने अधिकाऱ्यांवर गोळीबार केला की नाही, याबद्दल मात्र माहिती मिळू शकली नाही. परंतु बंदूक दाखविल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याला गोळ्या घातल्याचे सांगितले जाते.

व्हाईट हाऊसजवळ घडली घटना

गोळीबारानंत गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या संशयीताला तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याच्या प्रकृतीबाबत जास्त माहिती देण्यात आलेली नाही. या घटनेत इतर कुणीही जखमी झालेले नाही. व्हाईटहाऊसच्या जवळच दुसऱ्या ब्लाँकमध्ये ही घटना घडली. कायदा अंमलबजावणी अधिकारी या घटनेत सहभागी असल्याने या घटनेची चौकशी महानगर पोलिस विभागाकडून करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+