Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

US च्या बैठकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली रशियाला साथ; भारत अलिप्त का राहिला? काय आहेत कारणे...

रशिया- युक्रेन युद्धाला तीन वर्षे होत आल्यानंतर युरोपियन यूनियन (US) आणि युक्रेनने रशियन हल्ल्याचा निषेध करणारा प्रस्ताव मांडला. अमेरिकेने या प्रस्तावाविरुद्ध मतदान केले. अमेरिका रशियाच्या बाजूने उभी असल्याचे दिसून आले. यावरून डोनाल्ड ट्रम्प यांचे युरोपसोबतचे वाढते मतभेद आणि पुतिन यांच्याशी असलेली त्यांची जवळीक दिसून आली. अमेरिका, रशिया, बेलारूस आणि उत्तर कोरियाने युरोपियन युनियनच्या प्रस्तावाविरुद्ध मतदान केले. डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक जिंकल्यानंतर अमेरिकन धोरणात मोठा बदल केल्याचे या प्रकरणानंतर दिसून आले. प्रस्तावाविरुद्ध मतदान करुन ट्रम्प यांनी रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना हल्ल्याच्या जबाबदारीतून मुक्त केल्याचे दिसले.

Russia-Ukraine war

९३ पाठींबे तर १८ विरोध

युरोपच्या प्रस्तावाला ९३ देशांनी पाठिंबा दिला, तर १८ देशांनी विरोध केला. या मतदानापासून भारत दूर राहिला. या ठरावात रशियावर आक्रमक देश असा शिक्कामोर्तब करण्यात आला होता. तसेच युक्रेनमधून रशियाने आपले सैन्य मागे घ्यावे असे आवाहनही करण्यात आले होते. सोमवारी ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतली तेव्हा मतदान झाले. दोघांनी जी-७ नेत्यांशी युद्ध संपवण्यासाठी शांतता चर्चेच्या शक्यता आणि नाटो युतीच्या भविष्याबद्दल अमेरिका-युरोपमधील वाढत्या मतभेदांवर चर्चा केली.

भारत मतदानापासून दूर

युक्रेनने सादर केलेल्या प्रस्तावात रशियन सैन्य मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे, जो सुधारणांनंतर सादर करण्यात आला होता. भारत शांततेला पाठिंबा देण्याचे धोरण पाळतो. त्याने या प्रस्तावापासून स्वतःला दूर केले. ६५ देशांनी मतदानापासून दूर राहिले. रशियाविरोधी प्रस्तावांवर भारताची भूतकाळातही अशीच भूमिका होती. भारत दोन्ही बाजूंमधील संवाद आणि राजनैतिक संबंध पुन्हा सुरू करण्याचा पुरस्कार करतो. पण ट्रम्प प्रशासन रशियाशी थेट बोलत आहे. अलिकडेच सौदी अरेबियामध्ये रशिया आणि अमेरिका यांच्यात एक बैठक झाली, ज्यामध्ये युक्रेनला आमंत्रित करण्यात आले नव्हते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+