Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

एका दिवसात 1000 Gold Cardची विक्री; US मंत्र्याचा दावा, डोनाल्ड ट्रम्प यांची ही योजना नेमकी काय आहे?

Donald Trump and Gold Card : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच गोल्ड कार्ड योजना सुरू केली जाईल, अशी घोषणा केली होती. ज्या अंतर्गत अमेरिकेत 5 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करणाऱ्यांना कायमस्वरूपी निवास आणि पर्यायी नागरिकत्व दिले जाते. ट्रम्प यांच्या या धोरण सद्या चांगलेच उपयुक्त ठरल्याचे दिसून येत आहे. अमेरिकेच्या वाणिज्य सचिवांनी केलेल्या दाव्यानुसार, अमेरिकन सरकारने एकाच दिवसात 1000 गोल्ड कार्ड विक्री केले आहेत.

गोल्ड कार्ड योजना नेमकी काय?

मिळालेल्या माहितीनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांच्या गोल्ड कार्ड योजनेची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. पण असा दावा केला जात आहे की पुढील दोन आठवड्यात ते अधिकृतपणे लाँच केले जाईल. अमेरिकेचे वाणिज्य सचिव लुटनिक म्हणाले की, एलन मस्क यासाठी एक विशिष्ट सॉफ्टवेअर तयार करत आहेत. एका पॉडकास्टमध्ये बोलताना लुटनिक यांनी दावा केला काी, गोल्ड कार्ड योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक लोक रांगेत उभे आहेत. ते म्हणाले की, ही योजना अजूनही सुरुवातीच्या टप्प्यात आहे, पण तरीही मी काल एक हजार गोल्ड कार्ड विकले.

Donald Trump plan

अमेरिकेसाठी होणार लाभच लाभ

लुटनिकने पॉडकास्टमध्ये म्हटले आहे की, जर मी अमेरिकन नागरिक नसतो तर मी माझ्या पत्नी आणि मुलांसाठी गोल्ड कार्ड खरेदी केले असते. जर देशात कधी आणीबाणीची परिस्थिती उद्भवली तर मी थेट अमेरिकेत येईन. जर नीट पाहिले तर, लुटनिकचा दावा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेसाठी गेम-चेंजर ठरू शकतो. जर अमेरिकेत दररोज एक हजार गोल्ड कार्ड विक्री झाले तर अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होणार आहे. येथील अर्थव्यवस्थेला चांगली गती देखील मिळणार आहे.

गोल्ड कार्डचे फायदे काय आहेत?

  • अमेरिकेत गोल्ड कार्ड खरेदी करण्यासाठी, ५ दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करावी लागते.
  • गोल्ड कार्ड धारकांना कधीही अमेरिकेत प्रवेश करण्याचा आणि राहण्याचा अधिकार असेल.
  • गोल्ड कार्ड धारकांना अमेरिकन नागरिकत्व देखील मिळू शकते, परंतु हे ऐच्छिक आहे.
  • गोल्ड कार्ड धारकांना जागतिक करातून सूट मिळेल.

ट्रम्प 35 वर्षे जुनी व्यवस्था बदलतील

अमेरिकेत कायमचे वास्तव्य करण्यासाठी ग्रीन कार्ड आवश्यक आहे. यासाठी EB-1, EB-2, EB-3, EB-4 व्हिसा कार्यक्रम आहेत, परंतु EB-5 व्हिसा कार्यक्रम सर्वोत्तम आहे. हे 1990 पासून लागू आहे. यामध्ये, व्यक्ती कोणत्याही नियोक्त्याशी बांधील नाही आणि ती अमेरिकेत कुठेही राहू शकते, काम करू शकते किंवा अभ्यास करू शकते. हे साध्य करण्यासाठी 4 ते 6 महिने लागतात.

EB-4 व्हिसा कार्यक्रमाचा उद्देश परदेशी गुंतवणूक आकर्षित करणे आहे. यामध्ये, लोकांना किमान 10 नोकऱ्या निर्माण करणाऱ्या व्यवसायात 10 लाख डॉलर्सची गुंतवणूक करावी लागते. हा व्हिसा कार्यक्रम गुंतवणूकदार, त्याच्या जोडीदाराला आणि २१ वर्षांखालील कोणत्याही मुलांना अमेरिकेचे कायमचे नागरिकत्व देतो.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+