Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

US Deport Indians: पंजाब नाही,या राज्यातील अमेरिकेतून सर्वाधिक लोक हद्दपार झाले, जाणून घ्या

US Deport Indians: अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या भारतीय स्थलांतरितांना घेऊन जाणारे तिसरे विमान अमृतसरला नुकतचं पोहोचले आहे. या विमानात 112 अनिवासी भारतीय होते. हद्दपार करण्यात आलेल्यांमध्ये महिला आणि मुलांचा समावेश होता. यावेळी महिला आणि मुलांना मागे सोडून ​​पुरुषांना साखळ्यांनी बांधून पाठवण्यात आलं आहे.

दरम्यान याआधीही दोन अमेरिकन विमाने बेकायदेशीर भारतीयांना घेऊन भारतात पोहोचली होती. पहिल्या वेळी 104 लोकांना भारतात परत आणण्यात आलं आहे तर दुसऱ्या वेळी 116 लोकांना परत आणण्यात आलं. गल्लीपासून ते भारतीय संसदेपर्यंत याबद्दल गदारोळ सुरू आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही पंजाबमध्ये विमानाच्या लँडिंगबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी पंजाबची बदनामी होत असल्याचा आरोप केला आहे.

US deport indians

महिला आणि मुलांचा देखील समावेश

दुसऱ्या वेळी आणलेल्या 112 बेकायदेशीर स्थलांतरितांमध्ये पुरुषांची संख्या 89 होती तर 16 महिला आणि 7 मुले देखील होती. 112 लोकांपैकी बहुतेक लोक हरियाणाचे होते. त्यानंतर गुजरात आणि पंजाबमधील स्थलांतरित आले.

या राज्यातील इतक्या लोकांना तिसर्‍यांदा हद्दपार करण्यात आले आहे.

हरियाणा - 44
गुजरात - 33
पंजाब - 31
उत्तर प्रदेश - 2
हिमाचल - 1
उत्तराखंड-1
116 लोकांना दुसऱ्यांदा आणण्यात आलं
पंजाब - 67
हरियाणा - 33
गुजरात - 8
उत्तर प्रदेश - 2
महाराष्ट्र - 2
राजस्थान-2
हिमाचल - 1
गोवा-1
जम्मू आणि काश्मीर -1
पहिल्यांदाच 104 लोकांना आणण्यात आलं
पंजाब - 30
हरियाणा - 34
गुजरात - 33
उत्तर प्रदेश - 2
महाराष्ट्र - 3
चंदीगड - 2

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+