समोर कॅमेरा, हातात चप्पल... सीमा हैदरच्या पाकिस्तानी पतीचा व्हिडीओ व्हायरल; सीमाला परत पाठवणार का?
काश्मिरमधल्या पहलगाममध्ये मंगळवारी दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर भारत सरकारने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली. पाकिस्तानी नागरिकांना आता ४८ तासांच्या आत भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशानंतर आपल्या प्रियकरासाठी पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरची चर्चा सुरू झाली. सीमा हैदरलाही पाकिस्तानात पाठवले जाईल का? हा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. आता सीमा हैदरचा पाकिस्तानातील पहिला पती गुलामचा एक व्हिडीओ समोर आला आहे. तो व्हिडीओ पाहून पुन्हा चर्चा वाढल्या आहेत.

कोण आहे सीमा हैदर?
सीमा हैदर ही पाकिस्तानची आहे. भारतातील सचिन मीणा याच्या प्रेमात पडल्यानंतर ती पाकिस्तानातून नेपाळमार्गे भारतात आली होती. विशेष म्हणजे, पाकिस्तानमधील पहिला पती गुलाम हैदर याच्यापासून मीनाला चार मुले आहेत. ही मुले घेऊन ती सचिनकडे आली. कुठलाही व्हिसा व पासपोर्ट तिच्याकडे नव्हता. तरीही तिने भारतात येत सचिनशी लग्न केले. हे प्रकरण त्यावेळी चांगलेच गाजले होते.
आता काय होऊ शकते?
पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. त्यामुळे सीमा हैदरचे काय होणार, हा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. युपी सरकारने सीमा हैदरवर गुन्हा दाखल केला तर तिला शिक्षा होऊ शकते. कारण सीमाकडे कोणताही व्हिसा किंवा पासपोर्ट नाही. शिवाय सरकार तिला आता पुन्हा पाकिस्तानात जाण्याचा आदेशही देऊ शकते. अशा परिस्थितीत सीमा पुन्हा आपल्या पहिल्या पतीकडे जाईल का, हा प्रश्न विचारला जात आहे.
सिमाचा पहिला नवरा काय म्हणतो?
सीमा हैदरचे पहिला पती गुलाम हैदर याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात तो म्हणातो, आजही मी एवढेच सांगू इच्छितो की सीमाला पाकिस्तानात परत पाठवले पाहिजे. गेल्या दोन वर्षांपासून मी माझ्या मुलांसाठी आसुसलो आहे. भारत सरकारने माझ्या मुलांनाही पाकिस्तानात परत पाठवावे. जर तुम्ही सीमाला पाकिस्तानला पाठवू शकत नसाल तर तिला तिथे शिक्षा करा. तिला मदत करणारा, तिचा दत्तक भाऊ एपी सिंग, याला लाज वाटली पाहिजे.
चपलेने मारणार
गुलाम हैदर यांनी या व्हिडिओमध्ये पहलगाम हल्ल्याचा उल्लेख केलेला नाही. जवळजवळ प्रत्येक व्हिडिओमध्ये तो फक्त त्याच्या मुलांना परत मिळवण्यासाठी विनवणी करतो. त्याच व्हिडिओमध्ये, गुलामने त्याचे चप्पल काढले आणि म्हणाला, "या चप्पलने, जर सीमा आणि एपी सिंग माझ्यासमोर आले तर मी त्यांना खूप मारहाण करेन."












Click it and Unblock the Notifications