Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

काय सांगता? डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' निर्णय अन् गर्भवतींच्या दवाखान्यात रांगा; वाचा संपूर्ण प्रकरण

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी शपथ घेतली. या शपथविधीनंतर ट्रम्प यांनी तत्काळ काही महत्त्वाचे निर्णय जाहीर केले. त्यात एक निर्णय असा होता, जो ऐकूण गर्भवती महिलांना धक्काच बसला. विदेशातून अमेरिकेत स्थायिक झालेल्या विशेषतः भारतीय गर्भवती महिलांनी या निर्णयानंतर थेट रुग्णालयात रांगाच लावल्या. ट्र्म्प यांच्या याच निर्णयाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

Donald Trump

नेमके काय झाले?

नूतन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथविधीनंतर एक निर्णय घेतला. तो निर्णय होता जन्माधारीत नागरिकत्वाचा. या निर्णयानुसार, आता २० फेब्रुवारीनंतर अमेरिकेत जन्म झालेल्या कोणत्याही विदेशी जोडप्याच्या बाळाला अमेरिकेचे नागरिकत्व मिळणार नाही. या निर्णयाला अनेकांनी विरोध केला असला तरी हा कायदा २० फेब्रुवारीपासून आमलात येईल, असे सांगितले जात आहे.

निर्णयानंतर चित्र बदललं

डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानंतर अमेरिकेतली अनेक रुग्णालयात गर्भवती महिलांनी रांगा लावल्या. त्यातील अनेक महिलांनी आपल्या निर्धारीत वेळेपेक्षा लवकर प्रसुती करण्याची रुग्णालयाला विनंती केली. या महिलांनी आपली प्रसुती ही २० फेब्रुवारीच्या अगोदर करण्यासाठी ओषधोपचार सुरु केले आहेत. बाळाचा जन्म जर २० फेब्रुवारीच्या आत झाला तर त्याला अमेरिकेचे नागरिकत्व मिळणार आहे. कारण आत्तापर्यंत ग्रीनकार्ड धारक विदेशी नागरीकांना अमेरिकेत बाळ झाले तर, त्याला अपोआप अमेरिकेचे नागरिकत्व मिळत होते.

काय आहे धोका?

वेळेच्या आधी प्रसुती करण्याची विनंती करणाऱ्या महिलांमध्ये भारतीय महिला जास्त असल्याचे काहींचे म्हणणे आहे. त्यात काही आठ व सात महिन्यांच्या गरोदर महिलाही आहेत. मात्र वेळेच्या अगोदर प्रसुती झाल्यास बाळाचा पूर्ण विकास होत नाही. त्यामुळे फुफ्फुसासह इतर अवयवांनादेखील धोका पोहोचतो. त्यामुळे काही गर्भवती महिलांच्या या निर्णयामुळे धोका वाढण्याची शक्यता काहींनी व्यक्त केली आहे.

निर्णया विरुद्ध खटला दाखल

अमेरिकेच्या २२ प्रांतांचे अटर्नी जनरल यांनी ट्रम्प यांच्या त्या शासकीय आदेशाविरोधात मंगळवारी खटला दाखल केला. देशात जन्मलेल्या मुलाला थेट अमेरिकेचे नागरिकत्व देण्याचा शंभर वर्षे जुना नियम रद्द करण्याचे पाऊल राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी उचलले आहे. या नियमानुसार कोणा व्यक्तीचा जन्म जर अमेरिकेत झाला तर जन्माआधारे त्याला अमेरिकेचे थेट नागरिकत्व मिळत होते. जरी त्याचे आई-वडील दुसऱ्या देशाचे असतील तरी त्या व्यक्तीला ग्रीन कार्ड मिळते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+