भावड्याचा नादच खुळा! चक्क विमानाच्या लँडिंग गिअरमध्ये लपून 13वर्षाच्या मुलाचा काबूल ते दिल्ली प्रवास
afghan boy landing gear flight kabul to delhi : अफगाणिस्तानमधील एका १३ वर्षीय मुलाने केलेले धाडस सध्या चर्चेचा विषय बनले आहे. या मुलाने चक्क एका प्रवासी विमानाचा लँडिंग गिअरमध्ये (चाकांजवळच्या भागामध्ये) लपून काबूलहून दिल्लीपर्यंतचा प्रवास केला. ही घटना रविवार, २१ सप्टेंबर रोजी घडली. त्यासंबंधीची माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे मुलाच्या या कृत्याला धाडस म्हणावे की वेडपणा अन् विमान सुरक्षारक्षकांना काय झोपली लागली होती का, असा सवाल केला जात आहे.

(Photo credit: Image created with AI, viral on social media)
नेमकी कशी घडली घटना!
अफगाणिस्तानच्या केएएम एअरलाइन्सचे विमान आरक्यू-४४०१ सकाळी ८:४६ वाजता (भारतीय वेळेनुसार) काबूलच्या हमीद करझाई विमानतळावरून निघाले आणि सकाळी १०:२० वाजता दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (टर्मिनल ३) उतरले.
विमान थांबल्यानंतर कर्मचाऱ्यांना विमानाच्या जवळ एक मुलगा फिरताना दिसला. त्यांनी तात्काळ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) कर्मचाऱ्यांनी त्या मुलाला ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले.
13 साल के बच्चे की ये हरकत हैरान करती है और सोचने पर मजबूर भी कि इतनी छोटी उम्र में इतना बड़ा रिस्क लेना..ये कोई मज़ाक नहीं ज़िंदगी से खेलने जैसा है।
— 𝒜𝓃𝓈𝒽𝓊𝓁 𝒦𝓊𝓂𝒶𝓇 ★° (@Anshulkgaurav) September 23, 2025
सुरक्षा व्यवस्था पर भी कई सवाल उठते हैं एयरपोर्ट जैसे हाई सिक्योरिटी ज़ोन में कोई बच्चा विमान के लैंडिंग गियर में कैसे पहुंच गया! pic.twitter.com/RzvUY48wD2
केवळ 'उत्सुकतेपोटी' केलेला प्रवास
अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता, या मुलाने सांगितले की, त्याने हे कृत्य केवळ उत्सुकतेपोटी केले. त्याला हे सर्व कसे वाटते, याचा अनुभव घ्यायचा होता. हा मुलगा अफगाणिस्तानमधील कुंडुझ प्रांताचा आहे.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, तो काबूल विमानतळावर घुसला आणि विमानाच्या मागील बाजूच्या लँडिंग गिअरच्या डब्यात लपण्यात यशस्वी झाला.
सर्व तपासणीनंतर विमान सुरक्षित असल्याचे घोषित करण्यात आले. त्याच दिवशी, त्याच विमानाने त्या मुलाला अफगाणिस्तानला परत पाठवण्यात आले.
सुरक्षा तज्ञांनाही आश्चर्याचा धक्का!
विमानाच्या लँडिंग गिअरमध्ये लपून प्रवास करणे हे अत्यंत धोकादायक आहे. सुरक्षा तज्ञांनुसार, विमान ३०,००० फूट उंचीवर पोहोचल्यावर, तेथील तापमान उणे ४० ते उणे ६० अंश सेल्सिअसपर्यंत खाली येते आणि ऑक्सिजनची पातळी खूप कमी होते. अशा परिस्थितीत काही मिनिटांतच बेशुद्धी किंवा मृत्यू होऊ शकतो. यामुळेच हा मुलगा जिवंत कसा राहिला, याबद्दल सुरक्षा यंत्रणांना आश्चर्य वाटत आहे. अशा प्रकारच्या प्रवासात जगण्याचा दर खूप कमी असून, जगभरात फक्त २०% लोकच जिवंत राहतात.
यापूर्वी, तालिबानने १५ ऑगस्ट २०२१ रोजी अफगाणिस्तानची सत्ता ताब्यात घेतल्यानंतर अनेक लोक देश सोडून जाण्यासाठी काबूल विमानतळावर जमा झाले होते. त्यावेळी काही अफगाण नागरिक अमेरिकन विमानांच्या चाकांवर लटकून प्रवास करण्याचा प्रयत्न करत होते, ज्यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले होते.












Click it and Unblock the Notifications