बिअरच्या कॅनवर चक्क महात्मा गांधींजींचा फोटो..? व्हिडीओ व्हायरल झाल्याने उडाली एकच खळबळ
एका बिअर कॅनवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा फोटो असलेला व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. अर्थात हा बिअर कॅन रशियन कंपनीचा आहे. महात्मा गांधी यांचा फोटो व त्यांची सही असलेले पोस्टर्स या बिअर कॅनवर दिसत आहेत. गांधीजींचे नाव व स्केच या कंपनीने कॅनवर प्रिंट केले असल्याने एकच खळबळ उडाली आहे. भारतीयांकडून या प्रकाराचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

नेमका काय आहे प्रकार?
रशियातील एक बिअर कंपनीने त्यांच्या बिअर कॅनवर महात्मा गांधीजी यांचे स्केच व त्यांची सही प्रिंट करुन लावली आहे. या प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्याने हा व्हिडीओ काढला त्याने दोन बिअर कॅन हातात घेऊन ते दाखवले आहेत. त्यावर महात्मा एम. असे इंग्रजीतून लिहिलेले आहे. त्यावर गांधीजींचे स्केच असल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकाराचा तीव्र निषेथ केला जात आहे.
सर्व स्थरांतून निषेध
राष्ट्रपिता महात्मा गांधी हे आयुष्यभर व्यसनांपासून दूर राहिले. ते दारुच्या विरोधात होते. व्यसनांपासून दूर राहण्याचा सल्ला त्यांनी जगाला दिला. मात्र आता बिअरच्या कॅनवर चक्क त्यांचा फोटो व त्यांची सही असल्याने, नाराजी पसरली आहे. अनेकांनी या व्हिडीओच्या खाली आपल्या तीव्र भावनांना मॅसेजच्या रुपाने वाट करुन दिल्याचे दिसत आहे.
कोणती आहे कंपनी?
रशियातील निजनी नोवगोरोडमधील एका बारमध्ये फुटबाँल प्रेमिंनी भारतीय स्वातंत्र्यसैनिकांच्या नावाने बनविलेल्या पेयावरुन चांगलाच गदारोळ झाला आहे. या दारुच्या कंपनीने यापूर्वीही असे प्रकार केले आहेत. प्रमुख महापुरुषांना समर्पित करुन कॅनवर त्यांचे रेखाचित्र बनविण्याचे प्रकार ही कंपनी करत असते. या कंपनीने कथितपणे मदर तेरेसा, नेल्सन मंडेला, मार्टिन ल्यूथर किंग ज्युनिअर यांच्या नावेही बिअर बनविल्या आहेत. या प्रकारानंतर आता या कंपनीने थेट महात्मा गांधी यांच्या नावाने कॅन बनविल्याने त्यांचा निषेध व्यक्त केला जात आहे.
-
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!







Click it and Unblock the Notifications