Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मध्य स्वीडनमध्ये एका शाळेत 5 जणांवर गोळीबार; पोलिसांकडून तपास, नेमका कसा घडला प्रकार?

मध्य स्वीडनमधून मोठी बातमी समोर आली आहे. मध्य स्वीडनमधील एका शाळेत पाच जणांवर गोळीबार झाला. तर अनेक जण यात गंभीर जखमी झाल्याचे देखील सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यात सातत्याने गोळीबाराची घटना होऊ लागली आहे.

बीबीसीच्या वृत्तानुसार, मध्य स्वीडनमधील एका शाळेत पाच जणांवर गोळीबार झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. मंगळवारी दुपारी स्टॉकहोमपासून सुमारे 200 किमी पश्चिमेला असलेल्या ओरेब्रो या ठिकाणी ही गोळीबाराची घटना घडली. पोलिसांनी जखमींची संख्या अस्पष्ट असल्याचे सांगितले.

5 people shot at a school in central Sweden

मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार मंगळलारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. तर रहिवाशांना शाळेपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दुसरीकडे पोलिसांकडून मोठी कारवाई केली जात आहे. प्रवक्ते लार्स हेडेलिन यांनी सांगितले की, या ठिकाणी जीवघेणी व गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे.

'अत्यंत गंभीर परिस्थिती': मंत्र्यांचा दावा'

मीडिया गार्डियनच्या मते, स्वीडिश न्यायमंत्री स्ट्रॉमर यांनी एसव्हीटी ओरेब्रोला सांगितले की परिस्थिती खूप गंभीर बनलेली आहे. घटनेला प्रतिसाद देण्याचे काम अजूनही सुरू आहे. स्वीडिश सरकार अधिकाऱ्यांशी जवळून संपर्कात आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+