योगी आदित्यनाथ भाचीच्या लग्नासाठी उत्तराखंडला; तीन दिवसांच्या दौऱ्यात स्वतःच्या शाळेलाही देणार भेट

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ शुक्रवारी त्यांच्या भाचीच्या लग्नाला उपस्थित होते. उत्तराखंडमधील पौडी जिल्ह्यातील त्यांच्या वडिलोपार्जित गावी पंचूर येथे हा विवाहसोहळा अत्यंत साध्या पद्धतीने झाला. योगींच्या उपस्थितीत झालेल्या लग्न समारंभापासून माध्यमांना दूर ठेवण्यात आले होते. योगी तीन दिवसांच्या दौऱ्यावर येथे आले आहेत. शनिवारी ते जवळच्या थांगर येथील सरकारी प्राथमिक शाळेलाही भेट देतील.

Yogi Adityanath

योगींची शाळेला भेट

थांगर येथील प्राथमिक शाळेत योगींनी शिक्षण घेतले होते. त्या आपल्या शाळेला योगींनी उद्या शनिवारी भेट देणार आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर हा त्यांचा पहिलाच दौरा आहे. याआधी ते गोरखपूरचे खासदार असतानाही येथे आले होते. कार्यक्रमाच्या तयारीत व्यस्त असलेल्या शाळेतील शिक्षकांनी सांगितले की, योगी आदित्यनाथ येथील मुलांशी बोलतील आणि त्यानंतर ते कांडी येथील 'सरकारी ज्युनियर हायस्कूल'मध्येही जातील आणि तेथील मुलांशीही बोलतील.

शिक्षकांनी सांगितल्या आठवणी

कांडी हे गाव योगी आदित्यनाथ यांचे गुरू अवैद्यनाथ यांचे गाव आहे. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या आगमनाबाबत पंचूर, थांगर आणि आसपासच्या परिसरात उत्साहाचे वातावरण आहे. योगींच्या या भेटीला त्यांच्या बालपणीच्या आठवणींशी जोडले जात आहे. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सत्येंद्र शाह म्हणाले की, योगी आदित्यनाथ यांच्या आगमनासाठी शाळा चांगली सजवण्यात आली आहे. शाळेतील विद्यार्थी देखील त्यांच्या माजी विद्यार्थ्याचे स्वागत करण्यासाठी उत्सुक आहेत. शाळेच्या वरिष्ठ शिक्षिका रजनी बहुगुणा म्हणाल्या की, शाळेच्या जुन्या कागदपत्रांमध्ये योगी आदित्यनाथ यांचे नाव अजय मोहन बिष्ट असे नोंदवले आहे.

योगींचा तीन दिवासांचा दौरा

भाचीच्या लग्नासाठी योगी तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. योगींच्या शाळेतील शिक्षिका रजनी बहुगुणा यांनी योगींजींची शाळेची आठवण सांगितली. त्या म्हणाल्या, योगी आदित्यनाथ यांना १९७२ मध्ये येथे दाखल करण्यात आले होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री गुरुवारी पंचूर येथे पोहोचले होते आणि त्यांनी विठ्यानी येथील महायोगी गुरु गोरखनाथ सरकारी महाविद्यालयात दिवंगत संत महंत अवैद्यनाथ यांच्या प्रतिमेला फुले अर्पण केली. त्यानंतर, त्यांनी त्यांचे वडील दिवंगत आनंद सिंग बिष्ट यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधलेल्या उद्यानात १०० फूट उंच तिरंगा आणि दोन दिवसांच्या शेतकरी मेळ्याचे उद्घाटन केले. आदित्यनाथ यांनी सिद्धपीठ महादेव मंदिरात भेट देऊन प्रार्थना केली आणि महाविद्यालयाच्या गौरक्षा मासिकाचे प्रकाशनही केले. मुख्यमंत्री योगी शनिवारीच लखनौला परततील.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+