योगी आदित्यनाथ यांचे १३ राज्यात २०४ दौरे
Mumbai: लोकप्रियतेच्या बाबतीत भाजपमध्ये नरेंद्र मोदी यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे नेते असलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यनीही लोकसभा निवडणूक प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून आले. त्यांनी १३ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांत प्रचार विषयक २०४ कार्यक्रमांत सहभाग घेतला.
२७ मार्च रोजी मथुरा येथे "प्रबुद्ध संमेलन" या कार्यक्रमातून त्यांनी निवडणूक प्रचार मोहिमेचा शुभारंभ केला. आदित्यनाथ यांच्या प्रचार कार्यक्रमांमध्ये १६९ जाहीर सभा, १५ प्रबुद्ध संमेलने आणि १३ रोड शो यांचा समावेश होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथून तसेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी लखनौ येथून उमेदवारी अर्ज भरला.

यावेळी ते उपस्थित होते. राज्यातील ८० लोकसभा मतदारसंघांत त्यांनी दौरा केला. अन्य १२ राज्यातही त्यांनी प्रचार दौरा केला. फक्त भाजपच नाही तर सुहेलदेव भारतीय समाज पार्टी, अपना दल आणि राष्ट्रीय लोकदल या पक्षांचाही त्यांनी प्रचार केला.
योगी आदित्यनाथ ही अवघ्या तीन महिन्यात राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात जाणारे उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. महाराष्ट्रातही त्यांनी महायुतीच्या प्रचारार्थ सभा घेतल्या आहेत. त्यांच्या सभांना सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत आहे.
भाजपचे दुसऱ्या क्रमांकाचे लोकप्रिय नेते
लोकप्रियतेच्या बाबतीत योगी आदित्यनाथ ही नरेंद्र मोदी यांच्या नंतर दुसऱ्या क्रमांकावर येतात. ते गेल्या अनेक वर्षांपासून गोरखपुर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत होते. २०१७ साली झालेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीनंतर त्यांना उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा देण्यात आली. त्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेशचा काया पालट केला असा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जातो.
गुन्हेगारांचे कंबरडे मोडले
उत्तर प्रदेश हा माफियाचा प्रदेश म्हणून ओळखला जात होता. अनेक माफिया राजकारणात बडी धेंडे झाली होती. तेथील गुन्हेगारीही टोकाला गेली होती. योगी आदित्यनाथ यांनी गुन्हेगारीचे कंबरडे मोडून टाकले. योगी आदित्यनाथ यांनी माफिया विश्वाचा बंदोबस्त केला. पायाभूत सुविधांच्या विकासाला प्रचंड गती दिली. थेट विदेशी गुंतवणूक वाढवली. त्यामुळे आज उत्तर प्रदेशचा चेहरा मोहरा बदलला आहे.
महाराष्ट्रातही योगींचा मोठा चाहता वर्ग
योगी आदित्यनाथ हे आपल्या धडाकेबाज निर्णयांसाठी ओळखले जाता. त्यांच्या या निर्णयांमुळे त्यांची सर्वत्र चर्चा होत असते. योगी आदित्यनाथ यांच्या चाहत्या वर्गांत तरुणांचा मोठ्याप्रमाणात समावेश आहे. महाराष्ट्रातही योगींना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांच्या या प्रसिद्धीचा लाभ घेण्याचा प्रयत्न महायुतीकडून सुरू आहे. म्हणून महाराष्ट्रातही योगी आदित्यनाथ यांच्या सभांचे मोठ्याप्रमाणात आयोजन केले जात आहे.












Click it and Unblock the Notifications