Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Senior citizen day : ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाच्या कोणत्या आहेत योजना, कसा मिळतो लाभ, जाणून घ्या!

Senior citizen day 2025 : घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींना कुटुंबाचा आधारस्तंभ मानले जाते. त्यांच्या अनुभवातून मिळणारा सल्ला, त्यांचे प्रेम आणि मार्गदर्शन हे अमूल्य असते. कुटुंबाला आणि समाजाला आकार देण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान लक्षात घेऊन, जगभरात २१ ऑगस्ट हा दिवस जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा केला जातो.

ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्याचा उद्देश

हा दिवस साजरा करण्यामागे अनेक महत्त्वाचे उद्देश आहेत. समाजासाठी, कुटुंबासाठी आणि राष्ट्रासाठी ज्यांनी आपले जीवन समर्पित केले, त्या ज्येष्ठ नागरिकांप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करणे हा मुख्य उद्देश आहे.

याशिवाय, वृद्धापकाळात त्यांना येणाऱ्या समस्या, त्यांचे हक्क आणि गरजांबद्दल समाजामध्ये जागरूकता निर्माण करणे हेही महत्त्वाचे आहे. त्यांना समाजात एक महत्त्वाचा घटक मानले जाते, ते कोणावरही ओझे नाहीत, याची जाणीव करून देण्यासाठी हा (world senior citizens day 2025) दिवस साजरा केला जातो.

world senior citizens day 2025

ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या सुविधा

भारत सरकारने ६० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तींना ज्येष्ठ नागरिक मानून, त्यांच्यासाठी विविध योजना आणि सुविधा सुरू केल्या आहेत. यामुळे त्यांना जीवनावश्यक गोष्टी मिळवणे आणि आर्थिकदृष्ट्या स्थिर राहणे सोपे झाले आहे.

आर्थिक योजना

ज्येष्ठ नागरिकांसाठी भारत सरकारने अनेक पेन्शन योजना सुरू केल्या आहेत. यामध्ये अटल पेन्शन योजना, राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली, प्रधानमंत्री वय वंदना योजना आणि वरिष्ठ निवृत्तीवेतन विमा योजना या प्रमुख आहेत. या योजनांमुळे निवृत्तीनंतरही त्यांना आर्थिक स्थैर्य मिळते. याव्यतिरिक्त, बचत योजनांवर त्यांना उच्च व्याजदर दिले जातात.

आरोग्य सुविधा

वृद्धापकाळात अनेक आजार येतात. अशा परिस्थितीत त्यांना योग्य उपचार मिळावेत यासाठी शासनाकडून आरोग्य सेवांवर विशेष सवलती दिल्या जातात.

प्रवास सुविधा

ज्येष्ठ नागरिकांना राज्य बसच्या प्रवासावर विशेष सवलत दिली जाते.

इतर फायदे

रेल्वे तिकिटांवरही ज्येष्ठ नागरिकांना सवलत दिली जाते, तसेच काही ठिकाणी करामध्येही सूट दिली जाते.

ज्येष्ठ नागरिक हे आपल्या समाजाचा एक अविभाज्य भाग आहेत. त्यांचा अनुभव आणि ज्ञान आपल्यासाठी एक मौल्यवान ठेवा आहे. त्यांच्या गरजा समजून घेऊन त्यांचा आदर करणे, हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+