Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Womens Day 2025 : गुगलकडून 'महिला शक्ती'ला सलाम केला, महिला दिनानिमित्त खास डूडल केलं तयार

Womens Day 2025 : आज संपूर्ण जगासोबत गुगल देखील 2025 चा आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करत आहे. यावर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिनी गुगल एका खास डूडलद्वारे STEM (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित) क्षेत्रातील दूरदर्शी महिलांच्या कामगिरीचा सन्मान करत आहे.

आज गुगलच्या होमपेजवर दिसणारी ही कलाकृती "अवकाश संशोधनात क्रांती घडवणाऱ्या प्राचीन शोध उघड करणाऱ्या आणि प्रयोगशाळेतील संशोधनात पुढाकार घेणाऱ्या महिलांच्या अभूतपूर्व योगदानावर प्रकाश टाकते" ज्यामुळे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र समजणे सोपे झाले.

Womens Day 2025 Google doodle

Womens Day: गुगलचे डूडल काय आहे?

गुगल डूडल हे एक थीमॅटिक चिन्ह आहे जे सर्च इंजिन त्यांच्या होमपेजवर विशेष प्रसंग चिन्हांकित करण्यासाठी वापरते. गुगलने प्रसिद्ध व्यक्ती, त्यांच्या कामगिरी आणि इतर गोष्टींचा आनंद घेण्यासाठी डूडलचा वापर केला आहे.

पहिले गुगल डूडल 1998 मध्ये गुगलचे सह-संस्थापक लॅरी पेज आणि सर्गेई ब्रिन यांनी तयार केले होते, जेणेकरून लोकांना कळेल की ते बर्निंग मॅनसाठी ऑफिसबाहेर असतील. 2000 मध्ये गुगलने फ्रान्समध्ये बॅस्टिल दिन साजरा करण्यासाठी पहिले आंतरराष्ट्रीय डूडल लाँच केले. लोकप्रिय गेम, पॅक-मॅनच्या 30 व्या वर्धापन दिनानिमित्त 21 मे 2010 रोजी पहिला इंटरॅक्टिव्ह गेम डूडल लाँच करण्यात आला.

Womens Day: STEM क्षेत्रातील महिलांचे डूडल

"हे डूडल आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करत आहे. जगभरात महिलांचे योगदान किती महत्त्वाचे आहे हे प्रतिबिंबित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी प्रथम 1975 मध्ये या सुट्टीला मान्यता दिली," असं गुगलने म्हटलं आहे. जागतिक STEM क्षेत्रात अजूनही महिलांचा वाटा फक्त 29 % आहे ही आकडेवारी समाविष्ट करण्यात आली आहे. याबाबत गुगलच्या संदेशात झालेल्या प्रगतीची कबुली देण्यात आली आहे."त्यांचे कार्य लैंगिक समानतेच्या दिशेने सुरू असलेल्या प्रगतीचे प्रतिनिधित्व करते, तरीही STEM हे अशा क्षेत्रांपैकी एक आहे जिथे अजूनही लक्षणीयरीत्या कमी प्रतिनिधित्व आहे," असे तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनीने म्हटलं आहे.

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे महत्त्व

1975 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी प्रथम 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला. तेव्हापासून आजपर्यंत संयुक्त राष्ट्रांचा हा कार्यक्रम जगभरातील देशांनी स्वीकारला आहे आणि महिलांना समर्पित केला आहे. महिलांनी केलेल्या सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक आणि आर्थिक कामगिरीची दखल घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. लिंगभेद संपवण्यासाठी आणि लिंग समानता साध्य करण्यासाठीच्या प्रयत्नांना प्रेरणा देण्यासाठी हा एक प्रसंग आहे.

या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाची थीम 'अ‍ॅक्सिलरेट अ‍ॅक्शन' आहे, जी महिलांच्या प्रगतीवर सकारात्मक परिणाम करणाऱ्या धोरणे, संसाधने आणि उपक्रमांना ओळखण्यासाठी, त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि पुढे नेण्यासाठी एक जागतिक आवाहन आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+