पंतप्रधान मोदींनी सहा महिलांच्या हातात दिले त्यांचे सोशल अकाऊंट; कोण आहेत या 6 महिला? वाचा...
जागतिक महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांचा सन्मान करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यांनी त्यांचे सहाही सोशल मिडिया अकाऊंट प्रेरणादायी महिलांच्या हाती दिले आहेत. या प्रेरणादायी महिला त्यांच्या आयुष्याचा प्रवास, यश, आव्हाने सर्वांसोबत शेअर करणार आहेत. त्यांचा प्रवास त्या जनतेसमोर सार्वजनिक करणार आहेत. विशेष म्हणजे या सहाही महिला भारताच्या पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, मध्य अशा वेगवेगळ्या भागांतून आलेल्या आहेत.

या सहा महिलांमध्ये चेन्नई येथील वैशाली रमेशबाबू, दिल्लीतील डॉ. अंजली अगरवाल, बिहारमधील नालंदाच्या अनिता देवी, ओडिशाच्या भुवनेश्वरमधील एलिना मिश्रा, राजस्थानमधील अजायता शाह आणि मध्य प्रदेशातील सागर येथील शिल्पी सोनी यांचा समावेश आहे. यापैकी 4 महिलांनी त्यांचे अनुभव वैयक्तिकरित्या मांडले आहेत. शिल्पी आणि एलिना या दोघींनी त्यांचा प्रेरणादायी प्रवास एकत्रितपणे सांगितला आहे. या महिला क्रीडा, ग्रामीण उद्योजकता, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांसारख्या विविध क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करतात. मोदीजींनी निवडलेल्या सहा महिला कोण आहेत, त्या काय करतात, याबाबत आज आपण माहिती घेऊयात.
१. वैशाली रमेशबाबू
वैशाली रमेशबाबू या बुद्धीबळपटू म्हणजेच खेळाडू आहेत. लहान वयातच त्यांनी या खेळात प्रावीण्य मिळविले. वयाच्या वयाच्या सहाव्या वर्षापासून सर्वोच्च स्तरावरील स्पर्धेत त्यांनी प्रतिनिधीत्व केले. 2023 मध्ये बुद्धिबळातील ग्रँडमास्टर ही प्रतिष्ठित पदवी त्यांनी मिळवली. बुद्धिमत्ता आणि चिकाटीने त्या जागतिक स्तरावर भारताचा गौरव वाढवत आहेत.
२. अनिता देवी
बिहारच्या अनिता देवी यांची ओळख बिहारची मशरुम महिला म्हणून आहे. गरीबी आणि प्रतिकुल परिस्थितीतून त्यांनी स्वावलंबी होण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. 2016 मध्ये त्यांनी माधोपूर फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनीची स्थापना केली. मशरूम लागवडीतून त्यांनी आर्थिक उन्नती साधली. त्यांनी शेकडो ग्रामीण महिलांना रोजगार मिळवून दिला. महिलांना आर्थिक स्वातंत्र्य आणि आर्थिक सक्षमीकरणाचा मार्ग त्यांनी दाखवला.
३. अजयता शाह
अजयता शहा यांनी ग्रामीण उद्योजिकांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यांनी आत्तापर्यंत 35,000 हून अधिक महिलांना डिजिटलदृष्ट्या सक्षम बनविले आहे. त्या सध्या फ्रंटियर मार्केट्सच्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. महिलांना स्वयंपूर्ण व्यावसायिक मालक आणि वितरक बनण्यासाठी त्यांची धडपड सुरु आहे.
४. डॉ. अंजली अगरवाल
डॉ. अंजनी अगरवाल या समर्थ्यम सेंटर फॉर युनिव्हर्सल ऍक्सेसिबिलिटीच्या संस्थापिका आहेत. तीन दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी सर्वसमावेशक गतिशीलता आणि अडथळा-मुक्त पायाभूत सुविधा सुनिश्चित करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले आहे. त्यांचे प्रयत्न भारतातील शाळा आणि सार्वजनिक ठिकाणे दिव्यांग लोकांसाठी अधिक सुलभ बनवण्यात मोलाचे ठरले आहेत.
५. एलिना मिश्रा आणि शिल्पी सोनी
एलिना मिश्रा आणि शिल्पी सोनी या दोन्ही शास्त्रज्ञ आहेत. एलिना मिश्रा भाभा अणु संशोधन केंद्र (BARC) मुंबई येथे अणुशास्त्रज्ञ आहेत. तर शिल्पी सोनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (ISRO) एक प्रतिष्ठित अंतराळ शास्त्रज्ञ आहेत. महिलांमधील बुद्धीमत्तेचे या दोघीही उत्तम उहाहरण ठरल्या आहेत.
-
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!








Click it and Unblock the Notifications