Womens Day 2025 : 8 मार्च रोजीच जागतिक महिला दिन का साजरा केला जातो, काय आहे त्यामागील इतिहास
Womens Day 2025 : अवघ्या काही दिवसांवर महिला दिन आलेला आहे. 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. हा दिवस महिलांसाठी खास असतो. परंतु, तुम्हाला माहिती आहे का, 8 मार्च रोजीच जागतिक महिला दिन का साजरा केला जातो. त्यामागील नेमका उद्देश काय होता अन् महिला दिनाची सुरुवात नेमकी कशी सुरू झाली, याविषयी सविस्तरपणे जाणून घ्या...!
महिलांसाठी 8 मार्च हा विशेष दिवस मानला जातो. त्यांच्या समान हक्कांना आणि समानतेला प्रोत्साहन देते. त्यांच्या कामगिरीवर प्रकाश टाकतो आणि महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देतो. या दिवशी विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. जगभरातील महिलांना सामाजिक, आर्थिक आणि राजकियदृष्ट्या सक्षम बनवण्यावर भर दिला जातो.

8 मार्च तारिख का निवडण्यात आली ?
1909 नंतर, फेब्रुवारीच्या शेवटच्या रविवारी महिला दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. 1910 मध्ये, सोशलिस्ट इंटरनॅशनलच्या कोपनहेगन परिषदेत, त्याला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यात आला. त्यावेळी त्याचा उद्देश महिलांना मतदानाचा अधिकार देणे हा होता. 1917 मध्ये रशियामध्ये महिलांनी ऐतिहासिक संप केला. ज्यामुळे झारने सत्ता सोडली आणि महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला.
म्हणून 8 मार्च हा महिला दिन म्हणून साजरा झाला
त्यावेळी रशियामध्ये ज्युलियन कॅलेंडर वापरात होते. तर जगातील इतर देशांमध्ये ग्रेगोरियन कॅलेंडर पाळले जाते. या दोन्ही कॅलेंडरच्या तारखांमध्ये खूप फरक होता. ज्युलियन कॅलेंडरनुसार, फेब्रुवारी 1917 चा शेवटचा रविवार 23 फेब्रुवारी होता आणि ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये ही तारीख 8 मार्च होती. अशाप्रकारे, 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला.
महिला दिनाचे महत्त्व काय?
महिला दिनाच्या माध्यमातून लोकांना महिलांच्या संघर्षाची जाणीव करून दिली जाते. हा दिवस महिलांवरील गैरवर्तन, समाजातील त्यांची भूमिका आणि त्यांच्या हक्कांबद्दल जागरूकता निर्माण करतो. कारण आजही अनेक महिलांना स्वतः निर्णय घेऊ शकत नाही.
कधीपासून झाली सुरूवात ?
संयुक्त राष्ट्रांनी पहिल्यांदाच 1975 आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला. दोन वर्षांनंतर, 1977 मध्ये, संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने सर्व सदस्य देशांना बोलावले आणि 8 मार्च हा दिवस महिला हक्क दिन म्हणून घोषित केला. परंतु त्याचा इतिहास बराच जुना आहे. 28 फेब्रुवारी 1909 रोजी अमेरिकन सोशलिस्ट पार्टीन पहिल्यांदा महिला दिन साजरा केला होता. परंतु, अधिकृत मान्यतेनंतर 8 मार्च हा दिवस निवडला गेला होता.
2025च्य महिला दिनाची थीम काय?
या वर्षी बीजिंग घोषणापत्र आणि कृती मंचाचा 30 वा वर्धापन दिन आहे, हा 1995 मध्ये 189 सरकारांनी जगभरातील महिलांच्या हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी मंजूर केलेला ऐतिहासिक अजेंडा आहे. तीस वर्षांनंतरही, उल्लेखनीय यश मिळाले असूनही, लिंग-आधारित हिंसाचार, आर्थिक असमानता आणि राजकीय प्रतिनिधित्वाचा अभाव यासारखे मुद्दे कायम आहेत. 2025 ची थीम तरुण महिला आणि मुलींना बदलाचे प्रतिनिधी म्हणून सक्षम करण्यावर आणि हवामान न्याय आणि डिजिटल समावेश यासारख्या नवीन आव्हानांना प्रतिसाद देण्यावर भर देण्यात आलेला आहे.












Click it and Unblock the Notifications