भर रस्त्यात वाजवला 'गेम'; सपासप वार करुन बजरंग दलाच्या कार्यकर्त्याला संपवलं, कोण होता सुहास शेट्टी?
बजरंग दलाचे माजी सदस्य सुहास शेट्टी यांची मंगळुरमध्ये हत्या करण्यात आली. या हत्येनंतर जातीय तणाव निर्माण झाला असून मंगळुर आणि परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. हत्या करण्यात आलेला सुहास शेट्टी हा हाय-प्रोफाइल फाझिल हत्याकांडातील प्रमुख आरोपी होता.

कोण होता सुहास शेट्टी?
सुहास शेट्टी (वय ४२) हा कर्नाटकच्या किनारपट्टीच्या राजकीय क्षेत्रात एक वादग्रस्त व्यक्तिमत्व होते. बजरंग दल सारख्या उजव्या विचारसरणीच्या हिंदुत्ववादी गटांशी त्याचा संबंध होता. त्यांच्यावर पाच गुन्हेगारी गुन्हे दाखल होते. त्यापैकी एक गुन्हा दक्षिण कन्नडमध्ये आणि चार मंगळुरू शहरात घडले होते. २०२२ मध्ये कटिपल्ला येथील २३ वर्षीय मुस्लिम तरुण मोहम्मद फाजिलच्या हत्येतील प्रमुख आरोपी म्हणून त्याला राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळाली होती. भाजप युवा मोर्चाचे नेते प्रवीण नेट्टारू यांच्या हत्येच्या काही दिवसांनंतर फाजिलची हत्या झाली होती. नेत्याच्या हत्येचा बदला घेतल्यानंतर सुहास शेट्टी देशभर प्रसिद्ध झाला.
कशी झाली शेट्टीची हत्या?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री ८:२७ वाजता किन्नीपाडवू या गावाजवळ शेट्टीवर प्राणघातक हल्ला झाला. शेट्टी पाच जणांसह एका कारमधून जात असताना त्यांच्या गाडीला दोन कारने अडवले. तलवारी आणि धारदार शस्त्रांनी सज्ज असलेल्या पाच ते सहा हल्लेखोरांच्या गटाने शेट्टीवर क्रूर हल्ला केला. तलवारीने सपासप वार करुन या हल्लेखोरांना सुहास शेट्टीची हत्या केली. या हल्लेखोरांनी मास्क घातलेले असल्याचे सांगितले जाते. हल्ल्यानंतर सुहास शेट्टी याला एजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाला. बाजपे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून हल्लेखोर फरार आहेत.
मंगळुरूमध्ये हाय अलर्ट
हत्येनंतर तत्काळ मंगळुर पोलिस अॅक्शन मोडवर आले. मंगळुरू शहराचे पोलिस आयुक्त अनुपम अग्रवाल यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNS) च्या कलम १६३ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले. ते ६ मे पर्यंत राहणार आहेत. विश्व हिंदू परिषद (VHP) सह अनेक हिंदू गटांनी शुक्रवारी दक्षिण कन्नडमध्ये बंदची हाक दिली. ज्यामुळे हंपनकट्टा, सुरथकल, उल्लाल आणि पुत्तूर येथे व्यापक बंद पाळण्यात आला. KSRTC आणि खाजगी बसेसवर दगडफेकीच्या घटना घडल्या. ज्यामुळे वाहतूक अधिकाऱ्यांना उपनगरीय सेवा स्थगित कराव्या लागल्या. खबरदारी म्हणून अधिकाऱ्यांनी संवेदनशील झोनमध्ये दारू विक्रीवरही बंदी घातली.












Click it and Unblock the Notifications