Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

कोण आहेत मोहिनी मोहन दत्ता? ज्यांच्यासाठी रतन टाटा यांनी 500 कोटींची मालमत्ता सोडली

Who is Mohini Mohan Dutta : देशातील आघाडीचे उद्योगपती रतन टाटा आता आपल्यात नाहीत, पण त्यांच्या कार्याने, कामाने अजूनही आपल्यात आहेत. त्यांच्या संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. ही बातमी रतन टाटा यांच्या मृत्युपत्राशी संबंधित आहे.

रतन टाटा यांच्या मृत्युपत्रात एका मिस्ट्री मॅनची नोंद झाली आहे. या व्यक्तीला रतन टाटा यांनी त्यांच्या संपत्तीचा एक तृतीयांश म्हणजे सुमारे 500 कोटी रुपये दिले आहेत. या व्यक्तीचे नाव यापुर्वी फार कमी लोकांनी ऐकले असेल.

Ratan Tata

फोटो सौजन्य- पीटीआय

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मिस्ट्री मॅनची गणना रतन टाटांच्या जवळच्या लोकांमध्ये होत नव्हती. आता मृत्युपत्रात या व्यक्तीचे नाव पाहून टाटा कुटुंब आणि त्यांच्या जवळच्या लोकांनाही धक्का बसला आहे. हे मिस्ट्री मॅन दुसरे तिसरे कोणी नसून मोहिनी मोहन दत्ता आहे, जो ट्रॅव्हल क्षेत्रातील उद्योजक आहे आणि जमशेदपूरची रहिवासी आहेत.

दत्ता कुटुंब एक ट्रॅव्हल एजन्सी चालवत होते

मोहिनी मोहन दत्ता यांचे कुटुंब एकेकाळी स्टॅलियन नावाची ट्रॅव्हल एजन्सी चालवत होते, जी 2013 मध्ये ताज ग्रुप ऑफ हॉटेल्सचा भाग असलेल्या ताज सर्व्हिसेसमध्ये विलीन झाली. स्टॅलियनमध्ये दत्ता कुटुंबाचा 80% हिस्सा होता, तर उर्वरित 20% हिस्सा टाटा इंडस्ट्रीजकडे होता. मोहिनी दत्ता थॉमस कुकशी संबंधित कंपनी टीसी ट्रॅव्हल सर्व्हिसेसच्या संचालक देखील राहिल्या आहेत.

मोहिनी मोहन दत्ता कोण आहे?

रतन टाटा यांच्या जवळच्या लोकांच्या मते, मोहिनी मोहन दत्ता बऱ्याच काळापासून त्यांच्या संपर्कात होते. दत्ता टाटा कुटुंबातील सदस्यांना आणि जवळच्या मित्रांना ओळखत होते. दरम्यान जेव्हा दत्ता यांना याबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. रतन टाटा यांच्या मृत्युपत्रात चार जणांची नावे आहेत, यामध्ये सावत्र बहिणी शिरीन, दीना जेजीभॉय, डेरियस खंबाटा आणि मेहली मिस्त्री यांचा समावेश आहे, त्यांनीही या संदर्भात कोणतीही माहिती दिली नाही.

रतन टाटा यांच्या कुटुंबाशी जवळीक असल्याचा दावा

रिपोर्टनुसार दत्ता यांच्या दोन मुलींपैकी एकीने ताज हॉटेल्समध्ये काम केल्यानंतर 2024 पर्यंत नऊ वर्षे टाटा ट्रस्टमध्ये काम केलं आहे. टाटा समूहाच्या सूत्रांनुसार दत्ता यांनी स्वतःला टाटा कुटुंबाच्या जवळचे असल्याचे सांगितले आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये रतन टाटा यांच्या अंत्यसंस्कारादरम्यान मीडिया रिपोर्ट्समध्ये दत्ता यांनी सांगितले की, रतन 24 वर्षांचे असताना ते जमशेदपूरमधील डीलर्स हॉस्टेलमध्ये रतन टाटा यांना पहिल्यांदा भेटले होते.

दत्ता यांनी म्हटलं आहे की टाटा यांनी मला मदत करुन पुढे आणलं आहे. दत्ता यांनी दावा केला आहे की ते एकमेकांना 60 वर्षांपासून ओळखतात. डिसेंबर 2024 मध्ये मुंबईतील एनसीपीए येथे रतन टाटा यांच्या वाढदिवसाच्या समारंभात दत्ता यांनाही आमंत्रित करण्यात आलं होतं. रतन टाटा यांनी त्यांच्या मृत्युपत्रात त्यांची बहुतेक संपत्ती धर्मादाय कामांसाठी सोडली आहे. तसेच, रतन टाटा यांनी त्यांच्या सावत्र बहिणींसाठी त्यांच्या मृत्युपत्रात काही पैसे ठेवले आहेत. असे मानले जाते की त्याच्या सावत्र बहिणींनी त्यांचा वाटा दान करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

संपत्ती दान करण्यासाठी दोन ट्रस्ट तयार

रतन टाटा यांनी त्यांच्या शेवटच्या काळात बहुतेक संपत्तीचे वाटप करण्यासाठी दोन संस्था स्थापन केल्या होत्या. रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशन आणि रतन टाटा एंडोमेंट ट्रस्ट. टाटा सन्समध्ये त्यांचा थेट 0.83% हिस्सा असल्याचा अंदाज आहे. रतन टाटा यांची एकूण संपत्ती सुमारे 8,000 कोटी होती. सूत्रांचा असा दावा आहे की, त्याची प्रत्यक्ष निव्वळ संपत्ती खूप जास्त असू शकते.

2023 पर्यंत 186 कोटींची गुंतवणूक झाली होती

टाटा सन्समधील शेअर्स व्यतिरिक्त रतन टाटा यांच्याकडे फेरारी आणि मासेराती सारख्या लक्झरी कार, महागड्या पेंटिंग्ज, स्टार्टअप शेअर्स आणि इतर गुंतवणूक आहेत. आर्थिक वर्ष 2023 पर्यंत त्यांच्या वैयक्तिक गुंतवणूक वाहन आरएनटी असोसिएट्समध्ये 186 कोटी रुपयांची गुंतवणूक होती. परंतु ही रक्कम त्यांच्या प्रत्यक्ष बाजार मूल्यापेक्षा खूप जास्त असू शकते.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+