Who is Madhabi Puri Buch : कोण आहेत माधबी पुरी बुच ? जाणून घ्या सविस्तर माहीती
Who is Madhabi Puri Buch: सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांचा अदानी मनी सिफनिंग घोटाळ्यात सहभागी असलेल्या परदेशी संस्थांमध्ये भागीदारी असल्याचा आरोप अमेरिकन कंपनी हिंडेनबर्ग रिसर्चने शनिवारी केला. अदानी मनी सिफनिंग स्कँडलमध्ये वापरल्या गेलेल्या अस्पष्ट ऑफशोर संस्थेमध्ये माधबी पुरी बुच आणि तिच्या पतीचे स्टेक असल्याचे हिंडेनबर्ग अहवालात म्हटलं आहे.
हिंडेनबर्गचा हा अहवाल समोर आल्यानंतर माधबी पुरी बुच चर्चेत आले आहेत. माधबी पुरी बुच या सेबीच्या पहिल्या महिला अध्यक्षा आहेत.1 मार्च 2022 रोजी पदाचा कार्यभार स्वीकारला. माधबी पुरी बुच या सेबी चेअरपर्सन होण्यापूर्वी एप्रिल 2017 मध्ये सेबी मध्ये पूर्णवेळ संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

माधबी पुरी बुच जन्म 1966 मध्ये झाला. बुच यांचे वडील कॉर्पोरेट क्षेत्रात काम करत होते, तर त्यांची आई राज्यशास्त्रात डॉक्टरेट असलेली शिक्षणतज्ञ होत्या. माधबी पुरी बुच यांनी दिल्ली आणि मुंबईत शालेय शिक्षण पूर्ण केलं आणि दिल्लीतील सेंट स्टीफन कॉलेजमधून बॅचलरची पदवी मिळवली. त्यानंतर अहमदाबाद येथून इंडियन इंस्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट एमबीए पूर्ण केलं.
वयाच्या 18 व्या वर्षी झालं लग्न
माधबी पूरी बुच यांनी वयाच्या 18 पूर्ण झाल्यानंतर धवल बुच यांच्याशी लग्न झालं. धवल एका मोठ्या कंपनीत वरिष्ठ पदावर काम करत होते, वयाच्या 21 व्या वर्षी माधबी आणि धवलचे लग्न झाले. माधबी यांनी लग्नाचा आपल्या करिअरवर परिणाम जाणू दिला नाही. कुटुंब हीच त्याची सर्वात मोठी ताकद आहे, असं त्या म्हणतात. माधबी या त्याच्या पतीला त्याचा मित्र आणि मार्गदर्शक मानतात.
एमबीए झाल्यानंतर एनजीओमध्ये केलं काम
एमबीए केल्यानंतर माधबी पुरी बुच यांनी काही काळ एका एनजीओमध्ये काम केलं.1989 मध्ये ICICI बँकेत काम केले. यानंतर त्यांनी वेस्ट चेशायर कॉलेज, इंग्लंडमध्ये लेक्चरर म्हणून काम केले. 2006 मध्ये त्या ICICI सिक्युरिटीजमध्ये रुजू झाल्या. फेब्रुवारी 2009 ते मे 2011 पर्यंत कंपनीच्या CEO या पदावर त्यांनी काम केलं.
ग्रेटर पॅसिफिक कॅपिटलमध्ये सामील होण्यासाठी माधबी पुरी बुच 2011 मध्ये सिंगापूरला गेल्या. 2011 ते 2017 दरम्यान, त्यांनी झेनसार टेक्नॉलॉजीज, इनोव्हन कॅपिटल आणि हेल्थकेअर सारख्या अनेक कंपन्यांचे कार्यकारी संचालक म्हणून काम केले. बूच या इंडियन स्कूल ऑफ डेव्हलपमेंट मॅनेजमेंटचे (ISDM) स्वतंत्र संचालक आणि त्यांनी न्यू डेव्हलपमेंट बँकेचे सल्लागार म्हणूनही काम केले आहे.
कोण आहेत धवल बुच?
धवल हे बुच ब्लॅकस्टोन आणि अल्वारेझ आणि मार्सलचे वरिष्ठ सल्लागार आहेत. ते गिल्डनच्या बोर्डावर कार्यकारी संचालक म्हणूनही काम करतात. बूच हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्ली (IIT-D) चे माजी विद्यार्थी आहेत, जिथून त्यांनी 1984 मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली. त्यांनी युनिलिव्हरमध्ये कार्यकारी संचालकपद भूषवले आणि अखेरीस ते कंपनीचे मुख्य खरेदी अधिकारी बनले.
हिंडेनबर्गच्या आरोपात कोणतेही तथ्य नाही
सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बुच आणि त्यांचे पती यांनी शनिवारी संयुक्त निवेदन जारी करून हिंडेनबर्गचे आरोप निराधार आणि बिनबुडाचे आहेत. आपली आर्थिक स्थिती पारदर्शक आहे. हिंडेनबर्गच्या अहवालात केलेल्या आरोपात कोणतेही तथ्य नाही," असं निवेदनात म्हटलं आहे. आमचे जीवन आणि आर्थिक परिस्थिती हे सर्व आवश्यक खुलासे वर्षानुवर्षे सेबीला उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
-
गुढी कशी उभारावी? वाचा शास्त्रोक्त पूजा-विधी, शुभ मुहूर्त, मंत्र आणि आरती; करा नववर्षाचे स्वागत -
पुण्यासाठी मोठी बातमी! पुणेकरांचा प्रवास होणार सुसाट; रामवाडी-वाघोली मेट्रो कामाला गती; हा आहे फायदा -
युद्धाचा भडका! तरीही सोन्याच्या दरात मोठी घसरण! 10 ग्रॅमचा भाव झाला 'एवढा'; पहा मुंबई पुण्याचे दर -
सोन्याच्या दरात मोठी घसरण! दुबईत 10 तोळे सोने भारतापेक्षा 21 हजाराने स्वस्त; मुंबई, पुण्यातही स्वस्त -
हरीश राणांना कसा दिला जाणार 'इच्छामृत्यू'? व्हेंटीलेटर हटवणे ते अखेरच्या श्वासापर्यंत काय घडतं? वाचा -
काबुल हादरले! रुग्णालयावर भीषण 'एअरस्ट्राइक'; 400 जणांचा मृत्यू, 'त्या' व्हिडिओने जग सुन्न! -
Chaitra Amavasya 2026 :18 की 19 मार्च? चैत्र अमावस्या नक्की कधी? जाणून घ्या तिथी, शुभ-मुहूर्त, महत्व -
आजचे राशीचक्र: कुणाचे नशीब चमकणार आणि कुणाला संघर्ष करावा लागणार? वाचा आजचे राशीभविष्य -
प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! महाराष्ट्रात 5 हजार पदांसाठी मेगाभरती; चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा -
PF चे पैसे आता 3 दिवसांतच मिळणार! नोकरी बदलली तरी 'ऑटोमॅटिक ट्रान्सफर' होणार; नवे नियम वाचा -
Gudi Padwa 2026: गुढीपाडवा कधी आहे? का साजरा केला जातो हा सण? जाणून घ्या यामागील रंजक पौराणिक कथा -
LPG e-KYC Update : सर्व गॅस ग्राहकांसाठी ई-केवायसी गरजेची आहे का? पेट्रोलियम मंत्रालयाचा मोठा खुलासा







Click it and Unblock the Notifications