अरविंद केजरीवालांना धोबीपछाड करणारे भाजपचे परवेश वर्मा कोण आहेत, त्यांची संपत्ती किती, वाचा सविस्तर
Pravesh Varma NetWorth : दिल्ली विधानसभेचे निकाल लागलेले असून या ठिकाणी भाजपचे सरकार स्थापन होणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे. या निवडणुकीत सर्वात महत्त्वाचा निकाल लागला आहे. तो म्हणजे आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांचा झालेला पराभव. त्यांचा पराभव हा भाजप उमेदवार परवेश वर्मा यांनी केला. आहे. चला तर जाणून घेऊया परवेश वर्मा यांच्याविषयी. तसेच त्यांच्याकडे असलेल्या संपत्तीविषयी. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना मोठा पराभव पत्करावा लागला आहे. प्रवेश वर्मा यांनी अरविंद केजरीवाल यांचा ३००० हून अधिक मतांनी पराभव केला आहे.
एकूण संपत्ती किती?
अरविंद केजरीवाल यांना पराभूत करणारे परवेश वर्मा यांच्याकडे काय आहे? त्यांच्याकडे किती मालमत्ता आहे ते जाणून घ्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, प्रवेश वर्मा यांची एकूण मालमत्ता 95 कोटी रुपयांची आहे. त्यांची एकूण जंगम मालमत्ता 77 कोटी 89 लाख रुपये आहे. तर त्यांच्या पत्नीकडे 17 कोटी 53 लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे. प्रवेश वर्मा यांच्याकडे 11 कोटी 25 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता देखील आहे. तर त्यांच्या पत्नीच्या नावावर 6 कोटी 91 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.

परवेश वर्मा यांच्याकडे किती गाड्या अन् पैसे?
निवडणूक प्रतिज्ञापत्रात, परवेश वर्मा यांनी व्यवसाय आणि समाजसेवा हे त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत असल्याचे सांगितले आहे. त्याची पत्नी खाजगी सेवा आणि समाजसेवा करते. वर्मा यांच्याकडे सुमारे 2.2 लाख रुपये रोख शिल्लक आहे आणि त्यांच्याकडे 3 गाड्या देखील आहेत. यामध्ये 9 लाख रुपयांची टोयोटा फॉर्च्युनर, 36 लाख रुपयांची टोयोटा इनोव्हा आणि 11.17 लाख रुपयांची महिंद्रा एक्सयूव्ही यांचा समावेश आहे.
वर्मा कुटुंबाकडे एकूण किती सोने?
वर्मा कुटुंबाकडे सुमारे 72 लाख रुपयांचे सोने आहे. त्यापैकी प्रवेश वर्मा यांच्याकडे बाजारात 8.25 लाख रुपये किमतीचे 200 ग्रॅम सोने आहे, तर त्यांच्या पत्नीकडे 45.75 लाख रुपये किमतीचे 1.11 किलो सोने आहे. याशिवाय, त्यांच्या दोन्ही मुलींकडे 12.35 लाख रुपये किमतीचे 300 ग्रॅम सोने आहे आणि त्यांच्या मुलाकडे 6.17 लाख रुपये किमतीचे 150 ग्रॅम सोने आहे.












Click it and Unblock the Notifications