Parag Jain बनले RAWचे चीफ; कोण आहेत ते, कसा राहिला त्यांचा प्रवास; पंजाब कॅडरला पुन्हा मिळाला मान
Parag Jain becomes chief of RAW, Who is Parag Jain : रिसर्च आणि अनालिसिस विंग अर्थात 'रॉ' (RAW) च्या प्रमुखपदी आयपीएस अधिकारी पराग जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
1 जुलै 2025 पासून ते या पदावर रुजू होतील. तर सद्याचे रॉ (RAW) प्रमुख रवी सिन्हा हे वयोमानानुसार 30 जून रोजी निवृत्त होणार आहेत, त्यांची जागा पराग जैन हे पदभार स्वीकारतील. तर त्यांचा कार्यकाळ हा पुढील दोन वर्षांचा असणार आहे.
पंजाब कॅडरला मिळाला दुसऱ्यांदा बहुमान!
विशेष बाब म्हणजे, रिसर्च अँड अनालिसिस विंग (RAW) चे प्रमुख असलेले आणि जून 2023 मध्ये निवृत्त झालेले पंजाब कॅडरचे आयपीएस अधिकारी सामंत गोयल यांच्यानंतर, ही महत्त्वाची जबाबदारी पंजाब कॅडरचे दुसरे अधिकारी पराग जैन यांना देण्यात आली आहे. पराग जैन हे 1989च्या पंजाब कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत.

कोण आहेत पराग जैन अन् त्यांची कारकीर्द कशी?
पराग जैन हे दीर्घकाळ केंद्रात प्रतिनियुक्तीवर आहेत आणि ते कॅबिनेट शाखेत काम करत आहेत. त्यांना गुप्तचर आणि राष्ट्रीय सुरक्षेचा दीर्घ अनुभव आहे. जम्मू आणि काश्मीरमधील त्यांच्या कार्यकाळात त्यांनी दहशतवादविरोधी रणनीती आखण्यात आणि अंमलात आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
ऑपरेशन सिंदूरमध्ये घेतली महत्त्वाची भूमिका?
सध्या, जैन हे एव्हिएशन रिसर्च सेंटरचे प्रमुख आहेत, जिथे त्यांनी पाकिस्तानी लष्करी कारवाया आणि दहशतवादी लपण्याच्या ठिकाणांवरील महत्त्वाच्या गुप्त माहिती गोळा करण्याचे काम पाहिले, ज्यामुळे भारतीय सैन्याच्या यशस्वी ऑपरेशन सिंदूरचा मार्ग मोकळा झाला. त्यांच्या पत्नी सीमा जैन, ज्या 1992 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत, त्या देखील दिल्लीत प्रतिनियुक्तीवर आहेत.
वेगवेगळ्या देशांत केले भारताचे प्रतिनिधित्व!
पराग जैन यांनी कॅनडा आणि श्रीलंकेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. कॅनडामधील त्यांच्या पोस्टिंग दरम्यान त्यांनी भारताच्या सुरक्षेसाठी मोठा धोका मानल्या जाणाऱ्या खलिस्तान समर्थक नेटवर्कचा पर्दाफाश केला. त्यांनी भारतविरोधी घटकांच्या कारवायांवर बारकाईने लक्ष ठेवले आणि ठोस गुप्तचर माहिती गोळा केली.
सध्याचे RAW प्रमुखांनी केली वेगळी ओळख निर्माण!
30 जून रोजी निवृत्त होत असलेले सध्याचे RAW प्रमुख रवी सिन्हा हे 1988 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते छत्तीसगड केडरचे आहेत आणि त्यांना ऑपरेशन मॅन म्हणून ओळखले जाते.
त्यांनी त्यांच्या कार्यशैलीने गुप्तचर जगात एक विशेष ओळख निर्माण केली. त्यांच्या नेतृत्वाखाली RAW ने अनेक महत्त्वाच्या मोहिमा राबवल्या.












Click it and Unblock the Notifications