Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मराठमोळ्या मेजर सिता शेळके यांचं देशभरात होतयं कौतूक, मुसळधार पावसात उभारला होता 190 फुटाचा ब्रीज

Major Sita Shelke: वायनाडमध्ये झालेल्या भीषण आपत्तीनंतरही बचावकार्य सुरू आहे. लष्कराचे जवान रात्रंदिवस बचाव कार्यात गुंतले असून त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. मदत आणि बचाव कार्यादरम्यान भारतीय लष्करातील एका महिला अधिकाऱ्याचे नाव चर्चेत आले असून ते नाव आहे मेजर सीता शेळके.

होय...मेजर सीता शेळके यांच्या निस्वार्थ सेवा आणि समर्पणाबद्दल देशभरात कौतुक आहे. वास्तविक मेजर सीता शेळके यांच्या मार्गदर्शनखाली त्यांच्या टीमने बेली ब्रिजचं काम पूर्ण केलं. त्यांच्या प्रयत्नांमुळे चुरलमामळा येथील फुललेल्या नदीवरील 190 फूट लांबीचा बेली पूल अवघ्या १६ तासांत पूर्ण झाला.

बेली ब्रिज बांधण्यासाठी मेजर सीता शेळके आणि त्यांच्या टीमने 16 तास न थांबता काम केलं. जेणेकरून बचाव पथक मुंडकाई गावात पोहोचू शकेल. जाणून घेऊया मेजर सीता शेळके यांच्याबद्दल ज्यांनी हे काम न थांबता १६ तासांत पूर्ण केले...

कोण आहेत मेजर सीता शेळके?

सीता शेळके 2012 मध्ये भारतीय सैन्यात सहभागी झाल्या. सध्या त्या बंगळुरू स्थित भारतीय सैन्यात मद्रास अभियांत्रिकी ग्रुप मेजर म्हणून तैनात आहे. मेजर सीता शेळके या मूळच्या महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील असून चेन्नई ओटीए येथून प्रशिक्षण पूर्ण केले. भारतीय लष्कराच्या मद्रास अभियांत्रिकी गटाच्या (MEG) 70 सदस्यीय संघात मेजर सीता शेळके या एकमेव महिला अधिकारी आहेत.

major sita shelke

सोशल मिडीयावरुन होतोय कौतूकाचा वर्षाव

मेजर सीता शेळके यांचे पुलावर उभे असलेले फोटो शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यांचा फोटो शेअर करत एका यूजरने लिहिले की, 'मेजर सीता शेळके आणि इंजिनिअर रेजिमेंटचा अभिमान आहे. वायनाडमधील बेली ब्रिज 16 तासांपेक्षा कमी वेळात यशस्वीपणे बांधणे हे अविश्वसनीय आहे!' त्याचवेळी, स्थानिक मीडिया रिपोर्ट्समध्ये, या बचाव कार्याला गती दिल्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले.

MEG युनिट काय करते माहित आहे?

भारतीय लष्कराचा मद्रास अभियांत्रिकी गट (MEG) 'मद्रास सॅपर्स' या नावाने प्रसिद्ध आहे. या अभियांत्रिकी युनिटला सैन्यासाठी मार्ग साफ करणे, पूल बांधणे आणि लढाई दरम्यान लँडमाइन्स शोधणे आणि निष्प्रभ करणे असे काम दिले जाते. एवढेच नाही तर, टीम नैसर्गिक आपत्तींच्या वेळी बचाव कार्यात मदत करते आणि 2018 च्या पुराच्या वेळी केरळमध्ये विशेषत सक्रिय होती.

बेली ब्रिजचे बांधकाम केव्हा सुरू झाले?

बेली ब्रिजच्या पुलाचे काम 31 जुलै रोजी रात्री 9:30 वाजता सुरू झाले आणि 1 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5:30 वाजता पूर्ण झाले. या पुलाची ताकद तपासण्यासाठी लष्कराने यापूर्वी आपली वाहने नदीच्या पलीकडे नेली होती. हा बेली ब्रिज वायनाड जिल्ह्यातील मुंडक्काई आणि चुरलमला या सर्वाधिक प्रभावित क्षेत्रांना जोडण्यास मदत करेल. हे 24 बेली ब्रिज इरुवाझिंजीपुझा नदीवर बांधण्यात आला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+