Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

90 तास काम करा, घरी बसून बायकोकडे बघत बसणार का ? L&T चे अध्यक्ष कोण आहेत? त्यांचा पगार किती आहे?

Who is L&T Chairman SN Subramanian? इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनी आठवड्यातून 70 तास काम करण्याचा सल्ला काही दिवसांपुर्वी दिला होता. नारायण मूर्ती यांच्या विधानानंतर एका कर्मचाऱ्याकडून आठवड्यात किती काम अपेक्षित असावे याबद्दल वादविवाद सुरू झाला होता. त्यानंतर आता लार्सन अँड टुब्रो (एल अँड टी) च्या अध्यक्षांनी कामाच्या वेळेबद्दल असे विधान केले की त्यामुळे त्याच्यावर सर्वत्र टीका होत आहे.

या विधानावर लोक संताप व्यक्त करत सोशल मीडियावर कंपनीच्या अध्यक्षांवर जोरदार टीका करत आहेत. एवढेच नाही तर दीपिका पदुकोण, शिवसेना उध्दव ठाकरे गटाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांच्यासह अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी प्रतिक्रिया व्यक्त करत संताप व्यक्त केला आहे.

SN Subramaniam

'कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून 90 तास काम करावे'

खरं तर, लार्सन अँड टुब्रो (एल अँड टी) चे अध्यक्ष एस एन सुब्रमण्यम यांनी त्यांच्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सांगितले की, त्यांनी आठवड्यातून 90 तास काम करावे, शक्य असल्यास ते त्यांना रविवारीही काम करायला हवे. इतकेच नाही तर त्यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सांगितले की " घरी राहून तुम्ही किती वेळ बायकोकडे बघत राहणार ?" घरी कमी वेळ आणि ऑफिसमध्ये जास्त वेळ घालवा, असं विधान त्यांनी केलं होतं. त्यानंतर त्यांच्या चौफेर बाजूनी टीका होत आहे. लार्सन अँड टुब्रो (एल अँड टी) चे अध्यक्ष एस एन सुब्रह्मण्यम कोण आहेत आणि त्यांचा पगार किती आहे ते जाणून घ्या.

एसएन सुब्रमण्यम कोण आहेत?

16 मार्च 1960 रोजी चेन्नई तामिळनाडू येथे जन्मलेल्या सुब्रमण्यम यांनी कुरुक्षेत्रातील अभियांत्रिकी महाविद्यालयातून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. त्यांनी पुण्यातील सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटमधून बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (एमबीए) मध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे.

एल अँड टी चेअरमन एस एन सुब्रमण्यम यांची कारकीर्द

सुब्रमण्यम यांच्या कारकिर्दीची सुरुवात 1984 मध्ये झाली. जेव्हा ते एल अँड टी मध्ये प्रोजेक्ट प्लॅनिंग इंजिनिअर म्हणून रुजू झाले. नंतर, त्यांनी लंडन बिझनेस स्कूलमधून एक्झिक्युटिव्ह मॅनेजमेंट प्रोग्राम पूर्ण केला. कॉर्पोरेट जगात मोठे यश मिळवलेले सुब्रह्मण्यम यांना 2011 मध्ये एल अँड टी बोर्डात सामील करण्यात आलं. ऑक्टोबर 2023 मध्ये सुब्रह्मण्यम एल अँड टी चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार सांभाळला.

सुब्रमण्यम यांच्या कामगिरी

सुब्रह्मण्यम यांच्या नेतृत्वाखाली एल अँड टीने स्टॅच्यू ऑफ युनिटी, आयटीईआर, ड्युअल फीड क्रॅकर्स, ऑफशोअर प्लॅटफॉर्म, के९ वज्र, अटल सेतू आणि अयोध्या राम मंदिर यासह अनेक मोठे प्रकल्प पूर्ण केले आहेत. सुब्रमण्यम हे भारतातील क्लायमेट फायनान्स लीडरशिप इनिशिएटिव्ह (CFLI) च्या 9 संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. ते राउरकेला येथील राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या गव्हर्नर्स मंडळाचे मानद नियमित अध्यक्ष म्हणूनही काम करत आहेत. 2021 मध्ये कामगार आणि रोजगार मंत्रालयाने त्यांची या क्षेत्रातील कौशल्य आणि नेतृत्व ओळखून त्यांना दोन वर्षांच्या कालावधीसाठी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केलं होतं .

एसएन सुब्रमण्यम यांना हे पुरस्कार मिळाले

अभियांत्रिकी आणि व्यवस्थापनातील त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल सुब्रमण्यम यांना अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले आहेत. 2024 मध्ये भारतीय अभियांत्रिकी परिषदेने त्यांना विशिष्ट अभियंता पुरस्काराने सन्मानित केलं, ज्यातून उद्योगावरील त्यांच्या महत्त्वपूर्ण प्रभावावर प्रकाश टाकला गेला.

एल अँड टी चे अध्यक्ष एस एन सुब्रमण्यम यांना किती पगार मिळतो?

लार्सन अँड टुब्रोचे अध्यक्ष एसएन सुब्रह्मण्यम यांना 2023-24 मध्ये एकूण 51 कोटी रुपये पगार मिळाला. हा पगार एल अँड टी कर्मचाऱ्यांच्या सरासरी पगाराच्या 534.57 पट आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+