कोण आहे jyoti malhotra? पाकिस्तान, ISIसाठी हेरगिरी केल्याचा आरोप अन् कशी झाली तीला अटक?
Who is jyoti malhotra, Pakistan, ISI : भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणावाची स्थिती निर्माण झालेली आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर तर दोन्ही देशातील वातावरण चांगलेच तणावग्रस्त झाले होते.
अशातच, पाकिस्तानी लष्कर आणि गुप्तचर संस्था आयएसआयसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली हरियाणा आणि पंजाबच्या वेगवेगळ्या भागातून 6 जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या लोकांमध्ये लोकप्रिय ट्रॅव्हल ब्लॉगर आणि युट्यूबर ज्योती मल्होत्रा हीचा देखील समावेश आहे.
ज्योती मल्होत्रावर भारताशी विश्वासघात केल्याचा आणि पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयसाठी हेरगिरी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
चला तर जाणून घेऊया, ज्योती मल्होत्रा कोण आहे, आणि तिने खरच पाकिस्तानसाठी हेरगिरी केली का, तिच्या युट्युबर असा कोणता कंटेट आहे, ज्यामुळे पोलिसांना काही संशयास्पद गोष्टी दिसून आल्या आहेत.

कोण आहे ज्योती मल्होत्रा? (Who Is Jyoti Malhotra, YouTuber Arrested For Spying For Pakistan?)
हरियाणातील युट्यूबर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. ज्योतीचे इंस्टाग्राम तसेच यूट्यूबवर @travelwithjo1 नावाने अकाउंट आहे. यामध्ये तिने पाकिस्तान प्रवासाचे अनेक व्हिडिओ आणि रील पोस्ट केली आहेत. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरील एका पोस्टमध्ये इश्क लाहोर असे देखील लिहिलेले आहे.
ज्योतीच्या इन्स्टाग्राम हँडलवर पाकिस्तानशी संबंधित अनेक रील्स आणि व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेले आहेत. पाकिस्तानमध्ये बनवलेल्या प्रवासवर्णनाशी संबंधित रील्स आणि व्हिडिओंद्वारे ज्योतीने तेथील अनेक सकारात्मक गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न सातत्याने केला गेला. अशा परिस्थितीत, ज्योतीवर सोशल मीडिया इन्फ्लुयएसंर म्हणून तिच्या प्रभावाचा वापर गुप्तचर आणि प्रचारासाठी परदेशी एजंट्सकडून केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पाक संबंधित अनेक रील्स केले शेअर
ज्योतीवर तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे पाकिस्तानची चांगली प्रतिमा मांडण्याचे काम सोपविण्यात आल्याचा आरोप आहे. तिचे एका पीआयओशी जवळचे संबंध निर्माण झाले आणि अलीकडेच ती त्याच्यासोबत इंडोनेशियातील बाली येथे गेली.
तिने भारतीय ठिकाणांशी संबंधित संवेदनशील माहिती शेअर केली आणि दिल्लीतील तिच्या वास्तव्यादरम्यान पीएचसी हँडलर दानिशच्या संपर्कात राहिली.
ज्योतीने पाकिस्तानला जाऊन तिथल्या अनारकली मार्केटचा व्हिडिओ बनवला आणि तो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला. याशिवाय, तिने दोन्ही देशांची तुलना त्यांच्या खाद्यपदार्थ, संस्कृती आणि अशा अनेक उपक्रमांद्वारे करून संवेदनशील माहिती शेअर केली आहे.
पाकिस्तानी उच्चायोगातील कर्मचाऱ्यांशी जवळचे संबंध
पाकिस्तानी उच्चायोगातील कर्मचारी एहसान-उर-रहीम उर्फ दानिश यांना 13 मे 2025 रोजी भारत सरकारने हेरगिरीत सहभागी असल्याबद्दल पर्सना नॉन ग्राटा घोषित केले आणि देश सोडण्याचे आदेश दिले. हरियाणाची रहिवासी ज्योती सतत त्याच दानिशच्या संपर्कात होती. ज्योती मल्होत्रावर भारतीय दंड संहिता (BNS) च्या कलम 152 आणि अधिकृत गुपिते कायदा, 1923 च्या कलम 3, 4 आणि 5 अंतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत.
ज्योती ट्रॅव्हल व्लॉगर
ज्योती मल्होत्रावर 2023 मध्ये पाकिस्तान उच्चायोगामार्फत व्हिसावर पाकिस्तानला प्रवास केल्याचा आरोप आहे. ती पाकिस्तान उच्चायोग (पीएचसी) मधील कर्मचारी एहसान-उर-रहीम उर्फ दानिशच्या संपर्कात आली. ज्याच्याशी तिचे जवळचे संबंध प्रस्थापित झाले. गुप्तचर संस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार - ज्यांनी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांना माहिती दिली होती. त्यात अटक करण्यात आलेल्या सहा जणांमध्ये ज्योतीचा समावेश होता.
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी एजंटांच्या संपर्कात?
ज्योती मल्होत्रा व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि स्नॅपचॅट सारख्या एन्क्रिप्टेड प्लॅटफॉर्मद्वारे शाकीर उर्फ राणा शाहबाज आणि लोकांशी बोलत असे. ज्योती मल्होत्राने भारतीय ठिकाणांशी संबंधित संवेदनशील माहिती शेअर केल्याचा आरोप आहे. सोशल मीडियावर पाकिस्तानची सकारात्मक प्रतिमा सादर करण्यासाठी तिचा सक्रियपणे वापर केला जात होता, असाही आरोप केला जात आहे.
32 वर्षीय विधवा महिला गजाला कोण आहे?
- पाकिस्तानसाठी हेरगिरी अटक करण्यात आलेल्या युट्युबर ज्योती मल्होत्रासोबतच आणखी एक प्रमुख आरोपी महिलेला अटक करण्यात आलेले आहे. जीचे नाव गजाला आहे. जी पंजाबमधील मालेरकोटला येथील 32 वर्षीय विधवा आहे. 27 फेब्रुवारी 2025 रोजी, गजाला व्हिसासाठी अर्ज करण्यासाठी नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात गेली. जिथे ती दानिशला भेटली आणि त्याच्यासोबत माहिती शेअर केली.
- दानिशचे गजालासोबत चॅट आणि व्हिडिओ कॉलद्वारे प्रेमसंबंध होते आणि त्याने तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासन दिले होते. जसजसा वेळ गेला तसतसे दानिशने गजालाला पैसे पाठवायला सुरुवात केली, 7 मार्च रोजी फोन-पे द्वारे दहा हजार रुपये आणि 23 मार्च रोजी गुगल पे द्वारे 20 हजार रुपये पाठवण्यात आले. नंतर तिला वेळोवेळी 10 हजार, अठराशे रुपये, 899, 699 आणि तीन हजार रुपये पाठविण्यात आले.
- 23 एप्रिल रोजी, गजालाने तिची मैत्रीण बानू नसरीन, जी मालेरकोटला येथील आणखी एक विधवा होती, तिच्यासोबत पुन्हा पाकिस्तान उच्चायुक्तालयाला भेट दिली. दानिशने पुन्हा त्यांच्या व्हिसाची व्यवस्था केली, जी दुसऱ्या दिवशी देण्यात आली. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या इतरांमध्ये मालेरकोटला येथील यामीन मोहम्मदचा देखील समावेश आहे.ज्याने दानिशला आर्थिक व्यवहार आणि व्हिसा संबंधित कामांमध्ये मदत केल्याचा आरोप आहे.












Click it and Unblock the Notifications