Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

कोण आहेत न्यायाधीश यशवंत वर्मा? त्यांच्या घरात लागली होती आग, HC च्या न्यायाधीशांचा पगार किती असतो

Justice Yashwant Varma News : दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानी लागलेल्या आगीची घटना न्यायालयीन क्षेत्रात चर्चेचा विषय बनली आहे. 14 मार्च रोजी आगीच्या घटनेनंतर त्याच्या निवासस्थानातून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जप्त करण्यात आल्याच्या अफवा पसरल्या होत्या. त्यामुळे न्यायव्यवस्थेतील मोठा विषय समोर आला होता. मात्र त्यांच्या घरात फक्त आग लागली होती, त्यात कोणतीही रक्कम सापडली नाही, असा दावा आता अग्निशालम दलाकडून केला गेला आहे.

यशवंत वर्मा यांची अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली

दरम्यान या प्रकरणातील सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सरन्यायाधीश (CJI) संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखाली कॉलेजियमची बैठक झाली. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांची तात्काळ अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली करण्याचा निर्णय घेतला. याबाबतचा आदेश 20 मार्च रोजी जारी करण्यात आला.

high court

आगीची संपूर्ण घटना

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, आगीच्या वेळी न्यायमूर्ती वर्मा शहरात उपस्थित नव्हते. त्याच्या कुटुंबीयांनी तात्काळ अग्निशमन दल आणि पोलिसांना कळवले. आग विझवल्यानंतर अधिकाऱ्यांना घराच्या एका खोलीत मोठी रक्कम आढळली. ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवण्यात आली, ज्यामुळे हे प्रकरण भारत सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले. सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी ताबडतोब कॉलेजियमची बैठक बोलावली आणि या मुद्द्यावर चर्चा केली.

मात्र या सगळ्या अफवा असल्याचे आता समोर आले आहे. दिल्ली अग्निशमन सेवेचे प्रमुख अतुल गर्ग यांनी या सगळ्या अफवा असल्याचे व अशी कोणतीही रक्कम मिळाली नसल्याचे स्पष्ट केले आहे.

अंतर्गत चौकशी सुरू करण्याचा सल्ला

रिपोर्टनुसार, काही न्यायाधीशांनी न्यायमूर्ती वर्मा यांना स्वेच्छेने राजीनामा देण्याचा सल्ला दिला. जर त्यांनी राजीनामा देण्यास नकार दिला तर कॉलेजियमच्या काही सदस्यांनी अंतर्गत चौकशी सुरू करण्याचा सल्ला दिला. संसदेत महाभियोगाच्या प्रक्रियेकडे हे पहिले पाऊल असू शकते, अशाही चर्चा सुरु होत्या.

हायकोर्टच्या न्याय‍धीशांना किती असतो पगार

दरम्यान हे प्रकरण समोर आल्यानंतर लोकांना उत्सुकता लागली आहे की, हायकोर्टाच्या न्याय‍धीशांना किती पगार असतो. तसेच त्यांना भत्ते पेंशन आणि गॅच्यूटीचे किती पैसे मिळतात. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीशांचे आणि त्यांच्या न्यायाधीशांचे वेतन जानेवारी 2016 मध्ये शेवटचे सुधारित करण्यात आले होते. न्याय विभागाच्या मते, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना दरमहा 2.25 लाख रुपये वेतन मिळते.

जर आपण पेन्शनबद्दल बोललो तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना 13.50 लाख रुपये पेन्शन मिळते तर त्यांना ग्रॅच्युइटी 20 लाख रुपये मिळते. न्यायाधीशांना मूळ पगाराच्या 24% भत्ता मिळतो.याशिवाय, भारतातील सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना स्वतंत्रपणे Sumptuary Allowance मिळतो, जेणेकरून ते विविध सरकारी आणि सामाजिक बैठकांशी संबंधित खर्च व्यवस्थापित करू शकतील. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे वेतन आणि भत्ते राज्यांच्या एकत्रित निधीतून दिले जातात. तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे पेन्शन भारताच्या संचित निधीतून खर्च केले जाते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+