17 व्या वर्षी भारतीय लष्करात, ऑपरेशन सिंदूरची जगाला कहाणी सांगणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी कोण? वाचा
Who is Colonel Sophia Qureshi : भारताचे परराष्ट्रमंत्र्यांसह दोन महिला लष्करी अधिकाऱ्यांनी आज पत्रकार परिषद घेतली, यामध्ये सिंदूर ऑपरेशनची सर्व कहाणी भारतीय लष्करातील लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितली. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री, लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी आज सविस्तर ब्रिफींग केले. भारतीय महिलांचा लष्करात किती महत्वाचा सहभाग आहे हे यावरुन दिसतेच पण जगालाही हे समजून आले आहे.

पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात सर्व भारतीय पुरुष पर्यटकांचा दहशतवाद्यांनी बळी घेतला. यात कुटुंबाचा आधारस्तंभ गेल्याने देश हळहळला. काही महिलांच्या लग्नाला तर सात दिवस आणि दोन महिनेच झाले होते. या क्लेशदायक घटनेला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदुर राबवले. त्यानंतर आज सकाळी पत्रकार परिषद घेण्याचा मान लष्करातील दोन महिला अधिकाऱ्यांना देण्यात आला.
#WATCH दिल्ली | #OperationSindoor | कर्नल सोफिया कुरैशी ने मीडिया को संबोधित करते हुए पाकिस्तान और PoJK में मुंद्रिके और अन्य आतंकवादी शिविरों पर कई हमलों को दिखाते हुए वीडियो प्रस्तुत किए। pic.twitter.com/7mjDqXOGAQ
— ANI_HindiNews (@AHindinews) May 7, 2025
आज झालेल्या पत्रकार परिषदेची महत्वाची धुरा सोफिया कुरेशी यांनी सांभाळली. सोफिया कुरेशी यांनी जगाला भारताच्या सिंदुर मोहिमेची कहाणी सांगितली आणि आम्ही केलेला स्ट्राईक नागरी नुकसान होणार नाही याची दक्षता घेत फक्त दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी होता हे जगाला सांगितले. या लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी कोण हे जाणून घेऊया.
#WATCH | Delhi | #OperationSindoor| Col. Sofiya Qureshi, while addressing the media, presents videos showing destroyed terror camps, including Sarjal camp, Sialkot, which lies 6 km inside Pakistan.
— ANI (@ANI) May 7, 2025
It's the camp where those terrorists involved in the killing of 4 Jammu & Kashmir… pic.twitter.com/HYxsU2HUg4
कोण आहेत लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी?
- 35 वर्षीय सोफिया कुरेशी कर्नल सोफिया कुरेशी या भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल पदावरील अधिकारी आहेत. त्या सध्या सिग्नल कॉर्प्समध्ये सेवा देत आहेत.
- कर्नल सोफिया कुरेशी या भारतीय लष्कराच्या पहिल्या महिला अधिकारी आहेत, ज्या लष्कराच्या प्रशिक्षण सराव 'एक्सरसाइज फोर्स 18' कार्यक्रमाचे नेतृत्व करत आहेत.
- कर्नल कुरेशी या गुजरातमधील वडोदरा येथील आहेत. त्यांनी बायोकेमिस्ट्रीमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे.
- सोफिया कुरेशी 1999 मध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशन अंतर्गत सैन्यात सामील झाल्या. त्यावेळी त्या फक्त 17 वर्षांच्या होत्या.
- सोफिया कुरेशीचे आजोबाही सैन्यात होते. सोफिया यांचे पती मेकॅनाइज्ड इन्फंट्रीमध्ये आर्मी ऑफिसर आहेत.
- मार्च २०१६ मध्ये, सोफिया कुरेशी बहुराष्ट्रीय लष्करी सरावात लष्करी तुकडीचे नेतृत्व करणारी पहिली महिला अधिकारी बनली.
- 'एक्सरसाइज फोर्स 18' हा प्रशिक्षण सराव हा आतापर्यंतचा सर्वात मोठा परदेशी लष्करी सराव आहे. जो पुणे येथे आयोजित केला होता.

महिला शक्ती अन् हिंदू-मुस्लिम ऐकतेचा संदेश
पत्रकार परिषदेद्वारे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील 9 दहशतवादी तळांवर केलेल्या हवाई हल्ल्याची माहिती देण्यासाठी दोन महिला अधिकाऱ्यांसोबत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. यातून भारतीय महिलांची शक्तीचा जगाला संदेश दिला आहे आणि त्यासोबतच भारतातील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे संकेतही दिले आहेत.
काय म्हणाल्या कर्नल कुरेशी?
मरकज सुभानअल्ला ही आंतरराष्ट्रीय सीमा आहे ती शंभर किमी दूर आहे. तिथे जैश ए मोहम्मदचे मुख्यालय होते,तिथे ट्रेनिंग, रिक्रुटमेंट केले जायचे. तिथे भारतीय हवाईदलाने हल्ला केला. पाकिस्तानच्या कोणत्याही सैन्याच्या ठिकाणांना निशाणा बनवला गेला नाही तसेच नागरी नुकसानही झाले नसल्याचे वृत्त आहे.












Click it and Unblock the Notifications