गर्लफ्रेंडच्या नादात फसला अन् मेहुल चोक्सी पोलिसांच्या जाळ्यात अडकला? कोण आहे बारबरा जबारिका?
Mehul Choksi Arrested Latest News : सुमारे साडे तेरा हजार कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्याप्रकरणी भारतातून फरार असलेल्या हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर, भारत सरकारने त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी केली आहे.
बेल्जियमच्या फेडरल पब्लिक सर्व्हिस ऑफ जस्टिसने सोमवारी मेहुल चोक्सीच्या अटकेची पुष्टी केली. मेहुल चोक्सी हा पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी आहे. काही दिवसांपूर्वी तो बेल्जियममध्ये असल्याची माहिती समोर आली होती आणि आता त्याला अटक झाल्याची बातमी आली आहे. दरम्यान, मेहुल चोक्सी पोलिसांच्या जाळ्यात नेमका कसा अडकला याची माहिती आता समोर आली आहे. मुलीच्या नादात अ़डकला अन् तीनेच सापळा रचून त्याला फसवल्याची माहिती आता समोर येऊ लागलेली आहे.

12 एप्रिलमध्ये अडकला पोलिसांच्या नादात
प्रामुख्याने एनडीटीव्हीच्या अहवालानुसार, गीतांजली ग्रुपचे मालक मेहुल चोक्सीला 12 एप्रिल रोजी बेल्जियममध्ये अटक करण्यात आली होती. तो उपचाराच्या बहाण्याने स्वित्झर्लंडला जाण्याच्या तयारीत होता. ही अटक भारतीय एजन्सींच्या विनंतीवरून करण्यात आली होती, जे बराच काळ त्याचा शोध घेत होते, असेही सांगितले जात आहे.
2018 पासून भारतातून फरार
मेहुल चोक्सी 2018 मध्ये भारतातून पळून गेला होता. नंतर तो अँटिग्वा आणि बारबुडा येथे गेला. जिथे त्याने गुंतवणुकीद्वारे नागरिकत्व मिळवले होते. तो अनेक वर्षे रडारपासून दूर राहिला, परंतु मे 2021 मध्ये त्याला डोमिनिकन रिपब्लिकमध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याबद्दल अटक करण्यात आली. तथापि, काही दिवस तुरुंगात राहिल्यानंतर त्याला सोडण्यात आले.
मेहुल चोक्सीच्या हनी ट्रॅपची कहाणी
मेहुल चोक्सीने स्वतःला 'हनी-ट्रॅप' आणि अपहरणाच्या कटाचा बळी असल्याचे सांगितले होते. या काळात बारबरा जबारिका नावाच्या महिलेचे नाव समोर आले. त्यावेळी चोक्सीने म्हटले होते की, हंगेरीची रहिवासी बारबरा जबारिका हिने त्याला हनी-ट्रॅपमध्ये अडकवले होते. चोक्सीच्या म्हणण्यानुसार, त्याचे जबरदस्तीने अपहरण करण्यात आले, छळ करण्यात आला आणि अँटिग्वाहून बोटीतून डोमिनिकाला नेण्यात आले. त्याने असा दावा केला की बारबरा देखील या संपूर्ण कटाची एक भाग होती.
बारबरा जबारिका कोण आहे?
बारबरा जबारिकाच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, ती बल्गेरियातील एक प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट एजंट आहे. त्यांनी स्वतःला विक्री वाटाघाटीकार म्हणून वर्णन केले आहे आणि त्यांना रिअल इस्टेट आणि थेट विक्री क्षेत्रात काम करण्याचा अनुभव आहे.
चोक्सीच्या पत्नीचा धक्कादायक दावा
जेव्हा मेहुल चोक्सीला डोमिनिकामध्ये अटक करण्यात आली तेव्हा तो बारबरा जबारिकाच्या प्रेमात पडल्याचे समोर आले. मेहुल चोक्सीची पत्नी प्रीती चोक्सीने आरोप केला होता की ते 2020 मध्ये भेटले होते आणि बारबरा हनीट्रॅप कटाचा भाग होती असा दावा केला होता.
बार्बराने मेहुल चोक्सीचे दावे फेटाळून लावले
मेहुल चोक्सीने असा दावा केला होता की बारबरा जबारिकाने त्याच्याशी खोटी मैत्री केली आणि त्याच्या कथित अपहरणाच्या अगदी आधी त्याला जेवणासाठी आमंत्रित केले. चोक्सीच्या म्हणण्यानुसार, तो तिथे पोहोचताच त्याला जबरदस्तीने त्यांच्यासोबत घेऊन गेले. तथापि, बाबरिकाने हे दावे फेटाळून लावले. तिने प्रीती चोक्सीच्या आरोपांचे खंडन केले आणि काही अहवालांमध्ये दावा केल्याप्रमाणे ती चोक्सीची प्रेयसी नाही असे म्हटले.












Click it and Unblock the Notifications