कोण आहेत अधिवक्ता पियुष सचदेवा? जे मुंबई हल्ल्याचा दहशतवादी तहव्वूर राणाच्या बाजूने खटला लढवणार!
Who is Advocate Piyush Sachdeva : 26/11 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील जीवंत आरोपी तहव्वूर राणा आता भारताच्या तावडीत आला आहे. गेल्या सतरा वर्षांपासून तो भारताला हवा होता. त्याला विशेष विमानाने अमेरिकेतून सुरक्षेमध्ये 10 एप्रिल 2025 रोजी भारतात आणण्यात आले. त्याला फाशीची शिक्षा द्यावी अशी तमाम जनतेची मागणी समोर येत आहे, या प्रकरणात खटल्याला सुरुवात होत आहे. प्रत्यार्पण कायद्यानुसाक, अशावेळी त्याला फाशीची शिक्षा देता येते का हा चर्चेचा विषय आहे.
तहव्वूर राणा सध्या एनआयएच्या ताब्यात आहे. त्याला एनआयएने अमेरिकेतून आणण्यासाठी मोठे प्रयत्न केले होते, यासंबंधी एनआयएने एक प्रेसनोटही जारी केली आहे. त्यात मुंबई हल्ल्याचा मुख्य आरोपी ताब्यात असे म्हणत त्याला आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहितीही या नोटमध्ये दिली आहे. दरम्यान, तहव्वुर राणाला भारतात आणताच दिल्लीतील पालम विमानतळावर औपचारिकपणे अटक करण्यात आली आहे.
राणाला न्यायालयात हजर करणार
भारतात पोहोचल्यानंतर तहव्वुर राणा याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. यानंतर त्याला थेट पटियाला हाऊस येथील एनआयए न्यायालयात हजर केले जाईल. तहव्वूर राणा भारतात पोहोचताच कोर्टात तहव्वूर राणा यांची बाजू कोणता वकील करणार हे आता समोर आले आहे.
तहव्वूर राणाच्या बाजूने खटला कोण लढवणार?
26/11 मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाला विशेष एनआय न्यायाधीश चंद्रजित सिंह यांच्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तहव्वूर राणाचा खटला दिल्ली कायदेशीर सेवा वकील पीयूष सचदेवा न्यायालयात लढणार असून ते दहशतवादी राणाच्या बचावाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. ते ही कायदेशीर लढाई लढणार असल्याने आता ते कोण आहेत याबद्दल चर्चा सुरु आहे.
- कोण आहे पियुष सचदेवा?
- वनइंडिया हिंदीनुसार, दहशतवादी तहव्वूर राणाच्या वतीने खटला लढणारे पीयूष सचदेवा हे दिल्लीतील ज्येष्ठ वकील आहेत.
- दिल्ली राज्य विधी सेवा प्राधिकरणाशी संबंधित पियुष सचदेवा आता दहशतवादी तहव्वूर राणाला वाचवण्यासाठी न्यायालयात खटला लढणार आहे.
- याआधी पियुष सचदेवाने अनेक मोठे खटले लढवले आहेत.
पियुष सचदेवा दहशतवादी तहव्वूर राणाचा खटला का लढत आहे?
भारत हा लोकशाही प्रधान देश आहे आणि भारतात प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे, भारतीय कायद्याच्या न्यायिक व्यवस्थेनुसार, प्रत्येक प्रकारच्या आरोपीची बाजू मांडण्यासाठी वकील देण्याची सुविधा आहे. नियमांनुसार, एखादा गुन्हेगार स्वत:साठी वकील ठेवू शकत नसेल किंवा कोणताही वकील त्याची केस लढण्यास तयार नसेल, तर कैदी विधी सेवा प्राधिकरणाकडे स्वत:साठी वकिलाची मागणी करतो. ज्याच्या आधारे विधी सेवा प्राधिकरण कैद्यासाठी वकील ठेवते. त्याअंतर्गत तहव्वूर राणाचा खटला लढण्यासाठी पियुष सचदेवा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नियुक्ती- न्यायिक प्रक्रीयेचा भाग
तहव्वूर राणाचा खटला लढणाऱ्या पीयूष सचदेवाला आपल्या सुरक्षेची काळजी वाटत असून त्याचा फोटो प्रकाशित न करण्याची विनंती केली आहे असे वनइंडियाच्या वृत्तात म्हटले आहे. पियुष सचदेवा राणाचा खटला लढत आहे कारण त्याची न्यायिक प्रक्रियेचा भाग म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) गुरुवारी संध्याकाळी 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार तहव्वूर हुसेन राणा याला औपचारिकपणे अटक केल्यानंतर त्याचा फोटो जारी केला. ज्यामध्ये तो तपकिरी रंगाच्या कपड्यांमध्ये दिसत आहे. त्याचा फोटो मागून काढलेला आहे पण त्याची पांढरी दाढी दिसत आहे.
राणाच्या सुरक्षेसाठी होते swat कमांडो
तहव्वूर राणाला एनआयए मुख्यालयात हजर करण्यासाठी विशेष बुलेटप्रुफ कारचा वापर केला गेला, यासह SWAT म्हणजेच स्पेशल वेपन्स अँड टॅक्टिक्स कमांडो विमानतळावर तैनात करण्यात आले होते. बुलेटप्रुफ वाहनासोबतच निशानेबाज वाहनही स्टँडबायवर ठेवण्यात आले आणि राणाच्या सुरक्षेत कोणतीही कसर ठेवली गेली नाही.













Click it and Unblock the Notifications