Raksha Bandhan 2025 : बहिण भावातील नात्याचा गोडवा टिकवण्यासाठी 'या' ८ चुका टाळा!

Raksha Bandhan 2025 Avoid these 8 mistakes : रक्षाबंधन हा केवळ एक धागा बांधण्याचा सण नाही, तर भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्यातील प्रेम, विश्वास आणि अतूट बंधाचे ते प्रतीक आहे.

2025 मधील रक्षाबंधन (When is Raksha Bandhan 2025) जवळ येत असताना, हा सण अधिक शुभ आणि मंगलमय बनवण्यासाठी कोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि कोणत्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करावे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

रक्षाबंधन हा सण नातेसंबंधांचा गौरव करणारा आहे. या खास दिवशी बहिणी आपल्या भावांच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखासाठी प्रार्थना करतात, तर भाऊ त्यांना आयुष्यभर संरक्षण देण्याचे वचन देतात. हा सण म्हणजे केवळ धार्मिक विधी नसून, भावनिक गुंतवणुकीचे आणि परस्पर आदराचे एक सुंदर प्रदर्शन आहे.

या पवित्र दिवशी केलेल्या चुका या नात्याच्या गोडव्याला धक्का पोहोचवू शकतात. त्यामुळे, शुभ मुहूर्तावर, योग्य भावनेने आणि पूर्ण श्रद्धेने राखी बांधणे आणि या पवित्र नात्याचा धागा नेहमीच मजबूत ठेवणे आवश्यक आहे.

चला तर जाणून घेऊया, यंदाचे रक्षाबंधन कधी आहे, रक्षाबंधनाच्या दिवशी काय चूका टाळाव्यात, जेणेकरून हे नाते अधिक घट्ट होण्यास मदत होणार आहे.

Raksha Bandhan 2025

रक्षाबंधनाच्या दिवशी 'या' 8 चुका करणे जरूर टाळा..!

1. अशुभ वेळी राखी बांधू नका!

रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्यासाठी एक शुभ मुहूर्त असतो, जो पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भद्रा काळ आणि राहू काळात राखी बांधणे अशुभ मानले जाते. शास्त्रांनुसार, भद्रा काळात कोणतीही शुभ कार्ये करणे वर्ज्य मानले जाते. त्यामुळे, राखी बांधण्यापूर्वी शुभ मुहूर्त नक्की तपासा आणि त्याचे पालन करा.

2. भावाच्या कपाळावर कुंकू न लावता राखी बांधू नका

राखी बांधण्याच्या विधीमध्ये टिळकाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. कपाळावर टिळक न लावता थेट राखी बांधणे अपूर्ण मानले जाते. टिळक हे विजय, समृद्धी आणि संरक्षणाच्या इच्छेचे प्रतीक आहे. म्हणून, रक्षाबंधनाच्या दिवशी, सर्वप्रथम भावाला टिळक लावा आणि त्यानंतरच राखी बांधा.

3. काळे किंवा गडद रंगाचे कपडे घालू नका!

पारंपारिक मान्यतेनुसार, रक्षाबंधनाच्या शुभ प्रसंगी काळे किंवा खूप गडद रंगाचे कपडे घालणे टाळावे. पिवळे, गुलाबी, पांढरे किंवा क्रीमसारखे हलके आणि चमकदार रंग शुभ आणि पवित्रतेचे प्रतीक मानले जातात. असे रंग परिधान केल्याने सकारात्म्क ऊर्जा टिकून राहते, असे मानले जाते.

4. कडू किंवा आंबट पदार्थ खाऊ नका!

रक्षाबंधनाला एकमेकांना मिठाई खाऊ घालणे ही एक पवित्र परंपरा आहे, जी प्रेम आणि गोडवा यांचे प्रतीक आहे. त्यामुळे, या दिवशी आंबट किंवा कडू पदार्थ खाणे टाळावे. विशेषतः राखी बांधण्यापूर्वी मिठाई खाऊ घालणे खूप शुभ मानले जाते. ही परंपरा परस्पर नात्यात गोडवा टिकवून ठेवण्याचा संदेश देते.

5. भांडू नका किंवा कटू शब्द बोलू नका!

हा दिवस नातेसंबंधांचा उत्सव साजरा करण्याचा आहे, त्यामुळे या दिवशी भाऊ-बहिणींनी कोणत्याही प्रकारचे वादविवाद, भांडणे किंवा कठोर शब्द बोलू नयेत. जरी काही मतभेद असले तरी ते शांततेने आणि सामंजस्याने सोडवा. हा दिवस नातेसंबंध मजबूत करण्यासाठी आहे, त्यांच्यात अंतर वाढवण्यासाठी नाही.

6. राखी फेकून देऊ नका

राखी ही केवळ एक धागा नसून, ती प्रेम आणि विश्वासाचे प्रतीक आहे. अनेक लोक सणानंतर राखी कुठेही फेकून देतात, जे चुकीचे मानले जाते. राखी आदराने झाडाखाली पुरली पाहिजे किंवा आपल्या घरातील पूजास्थळी ठेवली पाहिजे. हे तिच्या पावित्र्याचा आणि महत्त्वचा सन्मान करणे दर्शवते.

7. राखी बांधण्यासाठी रिकाम्या हाताने जाऊ नका

जेव्हा बहिणी आपल्या भावाच्या घरी राखी बांधण्यासाठी जातात, तेव्हा रिकाम्या हाताने जाणे योग्य मानले जात नाही. पूजा थाळीत राखीसोबत मिठाई, दिवा (निरंजन), अक्षत (तांदूळ) आणि रोली (कुंकू) ठेवा. हे पूर्णता आणि पवित्रतेचे प्रतीक आहे.

8. भावानेही बहिणींना रिकाम्या हाताने परत पाठवू नये

राखी बांधल्यानंतर, भावाने बहिणीला भेटवस्तू किंवा काहीतरी खास द्यावे. ही भेट बहिणीच्या प्रेमाचा आणि समर्पणाचा आदर आहे. भेट महागडी असणे आवश्यक नाही, तर ती मनापासून आणि आपुलकीने दिली पाहिजे.

2025चे रक्षाबंधन कधी? (When is Raksha Bandhan 2025)

रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. या वर्षी श्रावणातील पौर्णिमा शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025 रोजी 02 वाजून 12 मिनिटांनी सुरू होईल. पौर्णिमेची तिथी 9 ऑगस्ट 2025, शनिवारी दुपारी 01 वाजून 24 मिनिटांनी संपेल. म्हणूनच रक्षाबंधन 9 ऑगस्ट, शनिवारी साजरे केले जाईल. रक्षाबंधनाची विधी वेळ - सकाळी 05:47 ते दुपारी 01 वाजून 24 मिनिटांपर्यंत असणार आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+