Valentine day 2025 : व्हॅलेंटाईन डे म्हणजे काय, 14 फेब्रुवारीलाच का साजरा केला जातो, वाचा इतिहास
History of Valentines Day : फेब्रुवारी महिना आला की प्रेमाचा महिना आला असे म्हटले जाते. प्रेम युगलांसाठी प्रेम व्यक्त करण्याचा हा महिना. आपल्या प्रिय व्यक्तीबद्दल प्रेम व्यक्त करण्याची व्हेलंटाईन वीकमध्ये नामी संधी असते. या आठवडाभरात विविध डे साजरे करून प्रेमभावना व्यक्त केली जाते. रोझ-डे ने सुरू झालेला व्हॅलेंटाईन वीक, 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन दिवसाने (Valentine Day) साजरा केला जातो. मुळात 14 फेब्रुवारीलाच व्हॅलेंटाईन डे का साजरा केला जातो. व्हॅंलेटाईन डेचा नेमका इतिहास काय आहे, चला तर जाणून घेऊया..!
Valentines Dayची सुरुवात कुठून व कशी झाली?
व्हेलेंटाईन डे ची सुरूवात रोम देशातून झाल्याचे सांगितले जाते. 'Aurea of Jacobus de Verizon' नावाच्या पुस्तकानुसार, रोममध्ये एक धर्मगुरू होते, ज्यांचे नाव सेंट व्हॅलेंटाईन असे होते. जगात प्रेम वाटण्यावर त्यांचा दृढ विश्वास होता. त्यांच्यासाठी प्रेम हेच जीवन होते. पण तिथला रोमन राजा क्लॉडियसला हे सर्व मान्य नसल्याने त्याचा प्रचंड विरोध होता. रोमन राजा क्लॉडियसचा असा विश्वास होता की, प्रेम आणि विवाह पुरुषांच्या बुद्धिमत्तेवर आणि सामर्थ्यावर परिणाम करतात. याच कारणामुळे राजाच्या राज्यात राहणारे सैनिक आणि अधिकारी लग्न करू शकत नव्हते.

राजाला विरोध करून सेंट व्हॅलेंटाईन यांनी प्रेमासाठी प्रेरित केले
राजाच्या या विरोधाला न जुमानता, संत व्हॅलेंटाईन यांनी रोमच्या लोकांना प्रेम आणि विवाहासाठी प्रेरित केले. जेणेकरून प्रेमाला चालना मिळू शकेल. यातून प्रेरीत होऊन राजाच्या राज्यात राहणाऱ्या अनेक सैनिक आणि अधिकाऱ्यांनी लग्न केले आणि आपले आयुष्य पुढे नेले. यामुळे संतप्त होऊन राजा क्लॉडियसने 14 फेब्रुवारी इसवी सन पूर्व 269 रोजी धर्मगुरू संत व्हॅलेंटाईन यांना फाशी दिली. त्या दिवसापासून दरवर्षी हा दिवस प्रेमाचा दिवस म्हणजेच व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो.
पहिला व्हॅलेंटाईन डे कधी साजरा करण्यात आला?
काही रिपोर्टमध्ये आलेल्या माहितीनुसार, पहिला व्हॅलेंटाईन डे सन 496 मध्ये साजरा करण्यात आला होता. ही परंपरा आजतागायत कायम आहे. आजही 14 फेब्रुवारीला जगभरात प्रेमाचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. पण त्याची सुरुवात रोमन फेस्टिव्हलने झाली. पाचव्या शतकाच्या अखेरीस, पोप गेलेसियस यांनी 14 फेब्रुवारीला 'व्हॅलेंटाईन डे' म्हणून घोषित केला आणि तेव्हापासून हा दिवस जगभरात साजरा केला जातो. रोमन लोकांसाठी हा एक सण मानला जातो. या दिवशी सामूहिक विवाह देखील होतात.












Click it and Unblock the Notifications