Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

आतिशी- सिसोदीयांकडे नेमकी संपत्ती किती? माजी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री करतात काय? चर्चा सुरु...

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. या निकालात सर्वात जास्त चर्चा झाली, ती माजी मुख्यमंत्री आतिशी व उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया यांची सिसोदिया गे गेली १० वर्षे दिल्लीचे उपमुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांच्याकडे किती संपत्ती आहे. त्यांचे शिक्षण किती झाले आहे, हे प्रश्न वारंवार विचारले गेले. या दोघांच्या संपत्तीबाबत आज आपण माहिती घेऊ...

delhi assembly election 2025

आतिशी यांची संपत्ती किती

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांची जागा घेणाऱ्या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री आतिशी यांनी शपथपत्रात ७६.९३ लाख रुपयांची संपत्ती जाहीर केली होती. त्यांच्या नावावर कोणतीही गाडी किंवा घर नाही. निवडणूक आयोगाला (EC) सादर केलेल्या शपथपत्रानुसार, तिच्या जंगम मालमत्तेत ३०,००० रुपये रोख, १ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि बँक खात्यात मुदत ठेवी आणि बचत म्हणून ठेवलेले अंदाजे ७५ लाख रुपये समाविष्ट आहेत. शपथपत्रात असेही उघड झाले आहे की आतिशीकडे कोणतीही स्थावर मालमत्ता नाही. २०२० मध्ये झालेल्या गेल्या विधानसभा निवडणुकीपासून, त्यांनी ५९.७९ लाख रुपयांची निव्वळ संपत्ती घोषित केली होती. तेव्हापासून आतिशीची आर्थिक मालमत्ता १७.१४ लाख रुपयांनी वाढली आहे. त्यांच्याकडे कार, घर किंवा इतर स्थावर मालमत्ता अजूनही नाही.

सिसोदिया यांच्याकडे किती आहे संपत्ती

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री मनीष सिसोदीया यांनी जंगपुरा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. आतापर्यंत ते पटपरगंज मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. सिसोदीया हे दिल्लीचे दहा वर्षे उपमुख्यमंत्री राहिले असले तरी, शपथपत्रानुसार त्यांच्याकडे ५७ लाख रुपयांची जंगम व स्थावर मालमत्ता आहे. राजकारणात येण्यापूर्वी ते अरविंद केजरीवाल यांच्यासोबत एनजीओत काम करत होते. त्यांनी दिल्लीतील भारतीय विद्या भवन येथून पत्रकारितेचा डिप्लोमाही केला आहे. त्यांच्याकडे ३४ लाख ४३ हजार ७६२ रुपयांची जंगम मालमत्ता असून, २३ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+