Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

केजरीवाल यांची 'संजीवनी योजना' काय आहे? कोणाला मिळणार फायदा, जाणून घ्या सर्व प्रश्नांची उत्तरे

What is Sanjeevani Yojana : 2025 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाचे (आप) संयोजक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जनतेला एक मोठे वचन दिले आहे. केजरीवाल यांनी दिल्लीतील वृद्धांसाठी 'संजीवनी योजना' जाहीर केली आहे. केजरीवाल म्हणाले की, 60 वर्षांवरील वृद्धांना या योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळणार आहेत.

जाहीर सभेला संबोधित करताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, निवडणुकीनंतर आम आदमी पक्ष पुन्हा सत्तेत आला तर 'संजीवनी योजना' लागू केली जाईल. इतकंच नाही तर 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या वृद्धांना ज्या खाजगी किंवा सरकारी रुग्णालयात उपचार घ्यायचे आहेत तिथे त्यांना मोफत उपचार दिले जातील, असे केजरीवाल म्हणाले.

What is Sanjeevani Yojana

संजीवनी योजना काय आहे?

- संजीवनी योजनेअंतर्गत दिल्लीतील ६० वर्षांवरील सर्व वृद्धांना मोफत उपचार मिळणार आहेत.
- या योजनेअंतर्गत वृद्धांना बिनशर्त मोफत उपचार मिळणार आहेत.
- खाजगी असो वा सरकारी, खर्चाला मर्यादा नाही.
- दिल्ली निवडणुकीनंतर संजीवनी योजना लागू होईल.

संजीवनी योजनेचा लाभ कसा मिळणार?

- 60 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या वृद्धांवर मोफत उपचार केले जातील.
- उपचारादरम्यान खर्चाची मर्यादा नाही
- दिल्लीच्या सर्व सरकारी आणि खाजगी रुग्णालयात मोफत उपचार उपलब्ध होतील.
- या योजनेत उत्पन्नाची मर्यादा नाही. श्रीमंत असो की गरीब, सर्वांचे उपचार मोफत होतील.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+